Last Updated:
Nalasopara News : संशय आणि संताप यांच्यातुन घडलेली एक घटना संपूर्ण कुटुंबासाठी काळरात्र ठरली. घरातील वादाचे रूपांतर अशा टोकाच्या घटनेत होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. नालासोपाऱ्यातील या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
नालासोपारा : लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद होणे हे अत्यंत सामान्य मानले जाते. पण काही वेळा हे वाद इतक्या टोकाला जातात की त्याचे परिणाम अत्यंत धक्कादायक ठरतात. सध्या एका कुटुंबात घडलेल्या अशाच एका घटनेने सर्वांनाच हादरुन सोडले आहे. नेमके काय घडले ते जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार,मृत महिला नसीबन्नी सा या त्यांच्या कुटुंबासह जाबर पाडा या परिसरात राहत होत्या. त्यांच्या पतीने नाव कलमा खान आहे. गेल्या काही महिन्यांपासून पत्नीच्या चारित्र्यावरुन दोघांमध्ये वारंवार वाद होते, अशी माहिती समोर येत आहे
9 जूनच्या रात्री कलाम खान आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाले त्यातून कलाम खानने पत्नीला बेदम मारहाण केली. हाताने, लाथांनी शिवाय लोखंडी पट्टीने मारले. याच मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्या उठल्या आणि बाथरुमला जाऊन आल्यानंतर पुन्हा झोपल्या. पण काही वेळानंतर महिलेच्या शरीराची काहीच हालचाल होत नसल्याचे कुटुंबियांना लक्षात आले. दुर्देवाने त्यानंतर त्यांना तपासले तेव्हा मृत्यू झाल्याचे समोर आले.
या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी पेल्हार पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयात हजर केल्यानंतर पतीला अटक केली आहे.सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून महिलेच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आणि अन्य पुरावे गोळा करत आहे.
Mumbai,Maharashtra
पतीने ओलांडल्या मर्यादा! महिला बाथरुममधून आली अन्…; खोलीतील दृश्य पाहून नातेवाईक जागेवरच सुन्न
