India vs Afghanistan, 1st ODI:भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (13 जून) धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे सामना प्रत्येकी 25 षटकांचा करण्यात आला आहे. गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांना भारताकडून पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
Toss – 5:15pm.
Start of play – 5:45pm.
– 25 overs a side match. pic.twitter.com/i1OuD8eJHN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2026
या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात हार्दिक पांड्या आणि विराट कोहली नाहीत. सुदैवाने, रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तान संघात रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत, जे सामन्याचे चित्र पालटण्यात पटाईत आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत केवळ चार एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात भारतीय संघाने तीन सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. याचा अर्थ अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे मोठे वर्चस्व आहे.
Back to ODI cricket and we couldn’t have asked for a more picture-perfect setting 🤩
🎥 All set for the 1️⃣st ODI 💪#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UOtefYimtR
— BCCI (@BCCI) June 13, 2026
या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, आणि प्रसिद्ध कृष्णा.
𝗗𝗿𝗲𝗮𝗺 𝗰𝗼𝗺𝗲 𝘁𝗿𝘂𝗲 🧢🇮🇳
Congratulations to Harsh Dubey and Gurnoor Brar on receiving their ODI debut caps from KL Rahul and Shubman Gill respectively 👏
Updates ▶️ https://t.co/lCuohEZYAl #TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GoZSxHSHVf
— BCCI (@BCCI) June 13, 2026
या सामन्यासाठी अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, अल्लाह गझनफर आणि मोहम्मद सलीम साफी.
Presenting #TeamIndia‘s XI for the 1️⃣st #INDvAFG ODI 📝
Updates ▶️ https://t.co/lCuohEZYAl @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1tV4kwGpkK
— BCCI (@BCCI) June 13, 2026
इतर महत्वाच्या बातम्या
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला