निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक? मतीन पटेल यांचा दावा काय? टीसीएस धर्मांतरण, लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट – Marathi News | Is Nida Khan Former MP Imtiaz Jalil relative What is the claim of Chhatrapati Sambhajinagar Municipal corporator Matin Patel Big update in Nashik IT Company conversion exploitation case


निदा खान, मतीन पटेल, इम्तियाज जलीलImage Credit source: एजन्सी

Nida Khan-Imtiaz Jalil-Matin Patel: नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सध्या अडचणीत सापडले आहेत. तर निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केला आहे. याप्रकरणात मतीन पटेल यांची नाशिकच्या एसआयटी पथकाने दोन तीन वेळा चौकशी केली आहे. त्यांची अजून एकदा चौकशी करण्यात आली. त्यांनी निदा खान हिच्याशी कशी भेट झाली, ते तिला कसे ओळख होते याची माहिती दिली. तर त्याचवेळी विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

इम्तियाज जलील यांचा प्रकरणाशी काहीच संबंध नाही

मी पोलिसांना म्हणालो की मला इम्तियाज जलील यांना कॉल करू द्या. इम्तियाज जलील यांना काहीही माहिती नव्हती. इम्तियाज जलील हे माझे नेता आहेत, मला काहीही अडचण आली तर मी जलील यांना फोन करतो. या प्रकरणात इम्तियाज जलील यांचा काहीही संबंध नाही. निदा खान ही इम्तियाज जलील यांचे नातेवाईक नाही, जो कुणी असं सांगतोय तो खोटं बोलत आहे. त्यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही असा खुलासा नगरसेवक मतीन पटेल यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांचं जलील यांच्यावर विशेष प्रेम

पालकमंत्र्यांचं इम्तियाज जलील यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच ते सारखं सारखं त्यांचं नाव घेत असल्याचा चिमटाही मतीन पटेल यांनी काढला. निदा खान ही जेव्हा वास्तव्याला होती, तेव्हा इम्तियाज जलील यांच्याशी बोलणेच झाले नाही. आमच्यात कोणताही फोन झाला नाही. माझ्या फोन मध्ये रेकॉर्डींग्स आहेत. इम्तियाज जलील यांचा याप्रकरणाशी काही संबंध नाही, असा दावा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी केला आहे. मी काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे याप्रकरणात कोर्टात लढा देणार असल्याचे मतीन पटेल म्हणाले.

निदा खानशी ओळख नाही

टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात निदा खान आरोपी आहे. तर निदा खान हिला आपण ओळखत नव्हतो. निदा खान माझ्या कार्यालयात आली होती. तिला मी 2-3 दिवसांसाठी रुम दिली होती. मला निदा खान कोण आहे हे माहिती नव्हतं. तिच्या आई-वडिलांनी मला फोन केला होता. त्यानंतर निदा खानचा फोन आला होता. या प्रकरणात मी ज्यांना घर विकलं, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आले आहे. त्याचं सुद्धा घर तोडण्यात आलं आहे, असा आरोप मतीन पटेल यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *