Kolhapur Crime : ओळखपत्राचा बहाणा करत फसवलं, फोटोग्राफरसह चौघांचा तरूणीवर सामूहिक अत्याचार – Marathi News | Maharashtra Crime : Four Arrested in Kolhapur Collective Physical Assault Case


भयानक घटनेने कोल्हापूर हादरलं

कधी नाशिक, कधी पुणे, तर कधी आणखी एखादं गाव. महिला, तरूणी, लहान मुली, वृद्धा.. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना गेल्या अनेक महिन्यांपासून कानावर येत आहेत, ऐकून संताप होत, मात्र गुन्हा करणाऱ्यांना काहीच जरब नाही. आज ही तर उद्या ती, भयानक बातम्या कानावर पडणं काही थांबत नाही, गुन्हे तर त्याहून थांबत नाहीत. यात आता आणखी एका भयानक घटनेची भर पडली आहे, ती कोल्हापुरातून. कोल्हापूरच्या राधानगरी परिसरातून हादरवणारी माहिती समोर आली आहे. या परिसरात एका कॉलेजच्या तरूणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचे फोटो व्हयरल करण्याची धमकी देत चार नराधमांनी अनेक महिने त्या तरूणीवर सातत्याने अत्याचार केल्याची हादरवणारी माहिती उघड झाली आहे.

या सामूहिक अत्याचार प्रकरणी चार तरुणांवर मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य शेटके,रणजीत मुधोळकर, प्रणवगिरी पालकर आणि विक्रम पाटील अशी या चार नराधमांची नावं असून त्यांनी तरूणीचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय.तब्बल 10 महिने हा घृणास्पद प्रकार सुरू होता. चारही नराधमांच्या मुसक्या आवलत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने केल्या अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे.त्याच्या मामाने फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय त्याला चालवायला दिला. याच फोटोग्राफीच्या व्यवसायातून आदित्य शेटके याची पीडित तरूणीशी ओळख झाली होती. ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने आदित्य आणि त्या तरूणीची ओळख झाली. त्याने तिला मुदाळतिट्टा येथे बोलावलं आणि मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीत नेलं. तेथे त्याने तिचे फोटो काढले, मात्र ते एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी त्याने पीडितेला दिली आणि तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला.

मात्र त्याचं दुष्कृत्य एवढ्यावरच थांबलं नाही. या अत्याचारानंतर आदित्यने त्या तरूणीची ओळख, त्याचा मित्र रणजित मुधोळकरशी करून दिली. त्यानेही त्या तरूणीला फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत, तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. कोल्हापूरच्या विविध लॉजमध्ये नेऊन त्याने वारंवार तिचं शोषण केलंय

अनेक महिने सुरू होते अत्याचार

हा घाणेरडा प्रकार पुढेही सुरूच राहिला आणि रणजीतने त्याच्या मित्राशी प्रणवगिरी पालकरशी तरूणीची ओळख करून दिली. त्यानेही तिला एका कारमधून लॉजवर नेत तिच्या असहाय्यतेचा गैरफयाद घेत लॉवर अत्याचर केले.. आणि विक्रम रामचंद्र पाटील यानेही असाच प्रकार करत तरूणीचं शोषण केलं. ” मी तुझे आधीचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकतो, हे प्रकरण मिटवेन,” असं खोटं आश्वासन विक्रमने तिला दिलं आणि पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. गेल्या 10 एक महिन्यांपासून चारही तरूणांचे हे घाणरेडे कृत्य सुरू होते.

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरूणीने अखेर कशीबशी हिंमत गोळा केली आणि पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर सामूहिक अत्याचार प्रकरणी चार तरुणांवर मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *