Drishyam 3 First Review: अजय देवगण (Ajay Devgn) सध्या ‘दृश्यम 3’ (Drishyam 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 27 सप्टेंबरपासून आगाऊ बुकिंग (ॲडव्हान्स बुकिंग) सुरू झालं असून तिकिटांची वेगानं विक्री होत आहे, अवघ्या पाच दिवसांतच 12 लाखांहून अधिक तिकिटं बुक झाली आहेत. जर तुम्ही हा सिनेमा पाहण्याचा विचार करत असाल, तर आता त्याचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे.
सिने समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून ‘दृश्यम 3’चा पहिला रिव्यू केला आहे. त्यांनी या सिनेमाला 5 पैकी 4.5 रेटिंग दिलंय. त्यांनी अजय देवगणच्या अभिनयाचं ‘असाधारण’ (Phenomenal) असं वर्णन केलं असून, जयदीप अहलावत हा सिनेमाचा सर्वात बेस्ट पार्ट असल्याचं नमूद केलंय. त्यांनी याबद्दल काय म्हटले आहे, ते खालीलप्रमाणे…
बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणार ‘दृश्यम 3’ (Drishyam 3 Box Office Collection)
तरण आदर्श यांनी ट्विटरवर ‘दृश्यम 3’चा फर्स्ट रिव्यू दिलाय आणि पोस्टमध्ये लिहिलंय की, “दृश्यम द कनक्लूजन आउटस्टँडिंग आहे. 4.5 रेटिंग… अपेक्षांवर खूपच मोठ्या प्रमाणात खरी उतरते. कोणत्याही शंकेशिवाय, ही दृश्यम फ्रेंचायझीची सर्वात उत्तम फिल्म आहे. 2026 च्या सर्वोत्तम फिल्मपैकी एक आहे. पक्का ब्लॉकबस्टर असेल…”
‘दृश्यम 3’चं दिग्दर्शन कसं आहे? (Drishyam 3 First Review By Taran Adarsh)
तरण आदर्श यांनी दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींची प्रशंसा केली आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाबाबत ते लिहितात, “दिग्दर्शक अभिषेक पाठक, ज्यांनी या मालिकेतील दुसरा भागही दिग्दर्शित केला होता, ते आजच्या काळातील सर्वोत्तम कथाकारांपैकी एक का आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध करतात. त्यांना या फ्रँचायझीचा गाभा उत्तमरीत्या समजला आहे. केवळ जुन्याच सूत्राची पुनरावृत्ती न करता ते कथानक पुढे नेतात, किंबहुना, दिग्दर्शन आणि लेखन ही या सिनेमाची दोन सर्वात भक्कम वैशिष्ट्ये ठरली आहेत…”
अजय देवगणसह इतर कलाकारांचा अभिनय (Drishyam 3 Star Cast)
तरण आदर्श यांनी पुढे लिहिलंय की, “सिनेमातील सर्वात उत्कृष्ट भाग म्हणजे, पूर्वार्धात अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यात झालेला सामना. तो खरोखरंच अप्रतिम आणि दाद मिळवण्याजोगा आहे. कोर्टरूममधील सीन्स हे देखील या सिनेमाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. किंबहुना, अजय देवगण, त्याचं कुटुंब आणि प्रकाश राज यांचा समावेश असलेले अगदी सुरुवातीचे सीन्सही एक शानदार क्षण आहेत…”
तरण आदर्श यांनी सिनेमाचा क्लायमॅक्स आणि कथानकावरही प्रकाश टाकलाय. ते म्हणतात की, “आता सिनेमाच्या महत्त्वपूर्ण क्लायमॅक्सकडे वळुयात : तो अपेक्षांवर खरा उतरतो का? शेवट प्रभावी आणि पटण्याजोगा आहे का? तो प्रेक्षकांचे समाधान करतो का? हो, हो, हो… सिनेमाचा शेवट जबरदस्त, खिळवून ठेवणारा आणि पूर्णपणे समाधानकारक आहे…”
‘दृश्यम 3’चा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?
दरम्यान, तरण आदर्श यांनी ‘दृश्यम 3’ सिनेमातील एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकलाय. ते म्हणतात, “अजय देवगण पुन्हा एकदा ‘विजय साळगावकर’च्या भूमिकेत परततोय. तो या फ्रँचायझीचा आत्मा आहेत आणि ‘दृश्यम: द कन्क्लुजन’मधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण दुवा आहे. त्यांनी ही आव्हानात्मक भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारलीय. विशेषतः जयदीप अहलावत यांच्यासोबतचा, इंटरवलपूर्वीचा सीन प्रेक्षकांना हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्यास नक्कीच भाग पाडेल…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :