जीवघेण्या आजारावर मात, धडाकेबाज खेळाडू पुन्हा सज्ज, 10 वर्षानंतर गाजवणार क्रिकेटचं मैदान 


Sport News : ऑस्ट्रेलियन (Australian) क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. डावखुरा फलंदाज निक मॅडिन्सन (Nic Maddinson) ऑस्ट्रेलियन संघात सनसनाटी पुनरागमन केले आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मात केल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मॅडिन्सनसोबत नवोदित यष्टीरक्षक फलंदाज सॅम हार्परलाही कसोटी संघात स्थान दिले आहे.

10 वर्षांनंतर मॅडिन्सनचे कसोटी संघात पुनरागमन

मॅडिन्सनने 2016 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी तीन कसोटी सामने खेळले होते. तेव्हापासून तो कसोटी संघाबाहेर होता. 2025 मध्ये वृषण कर्करोगावरील उपचार आणि केमोथेरपी झाल्यापासून तो एकही प्रथम-श्रेणी सामना खेळलेला नाही. असे असूनही, निवड समितीने त्याच्या अलीकडील फॉर्म आणि अनुभवाच्या आधारावर त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. केमोथेरपी पूर्ण केल्यानंतर, मॅडिसनने बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये सिडनी थंडरकडून आणि 2025-26  हंगामात न्यू साउथ वेल्सच्या सेकंड इलेव्हनकडून खेळला, मात्र तो शेफिल्ड शील्डला मुकला. गेल्या महिन्यात, त्याची न्यू साउथ वेल्सच्या शेफिल्ड शील्ड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली, ज्याचा नवीन हंगाम पुढील आठवड्यात सुरू होत आहे. कसोटी संघात निवड होण्यापूर्वीच, मॅडिसनने वन डे कपमध्ये व्हिक्टोरियाविरुद्ध 126 धावांचे धडाकेबाज शतक झळकावून आपली तंदुरुस्ती आणि फॉर्म दाखवून दिला. ऑस्ट्रेलियन फलंदाज निक मैडिनसनची (Nic Maddinson) तब्बल 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याचा फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे

सॅम हार्परची पहिली निवड

अनकॅप्ड यष्टीरक्षक-फलंदाज सॅम हार्परचा राष्ट्रीय कसोटी संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. हार्पर सध्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा भाग म्हणून भारतात आहे आणि भारत ‘अ’ संघाविरुद्ध एक अनधिकृत कसोटी मालिका खेळत आहे. पुदुचेरी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यात त्याने एक शानदार शतक झळकावले. परिणामी, हार्पर आता राष्ट्रीय कसोटी संघात सामील होण्यासाठी थेट भारतातून दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल.

ऑस्ट्रेलियाच्या संघात झालेला हा अचानक बदल दुखापतींमुळे आवश्यक झाला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे कसोटी मालिकेतून अधिकृतपणे बाहेर झाला आहे. अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला बुधवारी झालेल्या अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान पोटाच्या स्नायूला दुखापत झाली, त्यामुळे डर्बनमधील पहिल्या कसोटीसाठी त्याच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *