Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु


नवी दिल्ली : टाटा ग्रुपमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी सुरु आहे. टाटा सन्सच्या प्रमुख पदावर एन.चंद्रशेखरन यांची फेरनियुक्ती करण्यात आली. याला नोएल टाटा यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. तेव्हापासून टाटा ग्रुपमधील घडामोडी चर्चेत आहेत. आता टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्ट करण्यापासून रोखण्यासाठी टाटा ट्रस्टनं नवा प्लान केला आहे, त्यानुसार दोन कंपन्यांचं विलिनीकरण केलं जाणार आहे.  

टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सला आरबीआयच्या एनबीएफसी आणि सीआयसीच्या नियमांच्या कक्षेबाहेर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी टाटा ट्रस्टनं टाटा सन्सच्या फेररचनेचा प्रस्ताव ठेवला आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समध्ये सर्वाधिक 66 टक्के भागीदारी आहे.  टाटा सन्सच्या संचालक मंडळानं या प्रस्तावावर विचार करुन आवश्यक प्रक्रिया सुरु करावी असं ट्रस्टनं म्हटलं आहे.  

दोन कंपन्यांचं विलिनीकरण

टाटा ग्रुपच्या दोन कंपन्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम सोल्यूशन्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सचं टाटा सन्समध्ये विलिनीकरण केलं जाईल. ज्यामुळं टाटा सन्सचं कामकाज आणि त्याच्या आर्थिक रचनेत बदल होईल. विलिनीकरणानंतर टाटा सन्स एनबीएफसी आणि सीआयसीच्या नियामक अटींमध्ये अडकणार नाही याचा प्रयत्न केला जाईल, मात्र, त्याला आरबीआयची परवानगी आवश्यक असेल.  

टाटा ट्रस्ट दीर्घकाळापासून टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टिंग विरोधात आहे. प्रस्तावित फेररचनेचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे टाटा सन्सला नॉन लिस्टिकल म्हणजेच अनलिस्टेड प्रायवेट कंपनी ठेवण्याचा प्रयत्न आहे. टाटा सन्सकडून टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाती आणि व्यवसाय देखील केला जातो.  टाटा ग्रुपच्या प्रस्तावानुसार विलिनीकरण झाल्यास जुनी यंत्रणा पुन्हा मजबूत होईलं.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं टाटा सन्सला 2022 मध्ये अपर लेअर एनबीएफसी म्हणून वर्गीकृत केलं होतं. यामुळं कंपनीवर काही नियम लागू करण्यात आले होते. शेअर बाजारात कंपनीच्या लिस्टिंगचा मुद्दा चर्चेत आला होता. टाटा सन्सचा या वर्गीकरणातून बाहेर राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरबीआयनं सप्टेंबरमध्ये तो प्रस्ताव फेटाळला होता. दरम्यान, टाटा ट्रस्टकडून टाटा सन्सची रचना बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा ग्रुप आणि टाटा सन्समध्ये सुरु असेल्या वादाबाबात प्रतिक्रिया दिली होती. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *