Hair Care Tips : केस वाढत नाहीत? पातळ झालेत? या ७ घरगुती टिप्सने केस होतील लांब आणि मजबूत – Marathi News | How Can You Grow Long and Strong Hair Naturally


लांब केसांसाठी फक्त महागडी प्रोडक्ट्स वापरणं पुरेसं नाही. केसांची योग्य पद्धतीने निगा राखणे, तुटणे कमी करणे आणि स्काल्प निरोगी ठेवणेही तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या हेअर केअर रुटीनमध्ये या गोष्टीचा वापर केल्यास लवकरच केस मजबूत आणि लांब होतील.

आठवड्यातून १ – २ वेळा ऑइलिंग करा

केसांना तेल लावताना स्काल्पवर बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. जोरात चोळण्यापेक्षा सौम्य हाताने मसाज करा. तेल चांगलं लावल्यानंतर सौम्य तेलाने स्वच्छ करा.

केस धुताना शॅम्पू फक्त स्काल्पवर लावा

शॅम्पू संपूर्ण केसांच्या लांबीवर जोरात चोळण्याची गरज नसते. स्काल्पवर हलक्या हाताने शॅम्पू करा. स्काल्पवर शॅम्पू व्यवस्थित लागू द्या. ज्यामुळे स्काल्प निरोगी राहिल. केस लवकर वाढू लागतील.

प्रत्येक वेळी कंडिशनर वापरा

केस धुतल्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका. कंडिशनरमुळे केस अधिक मऊ होतात. गुंता सोडवताना केस तुटण्याचा धोका कमी होतो.

ओल्या केसांना जोरात विंचरू नका

ओले केस तुलनेने नाजूक असतात. त्यामुळे केस धुतल्यानंतर टॉवेलने जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने पाणी पुसून घ्या. केसांचा गुंता सोडवताना रूंद दातांचा कंगवा वापरा.

स्ट्रेटनर आणि कर्लरचा अतिरेक टाळा

रोज स्ट्रेटनर आणि कर्लर किंवा गरम हेअर ड्रायर वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हीट स्टाईलिंग शक्य तितकी कमी करा. गरज असल्यास लो किंवा मिडियम हिट वापरा.

रात्री झोपताना सैल वेणी बांधा

रात्री झोपताना उशीशी होणार्‍या घर्षणामुळे केस जास्त तुटतात. त्यामुळे केस घट्ट किंवा मोकळे न ठेवता सैल वेणी घालून झोपा.

आहारात प्रोटिन आणि आयर्नचा समावेश करा

केसांच्या आरोग्यासाठी बाहेरून केलेली काळजी पुरेशी नाही. आहारात डाळी, कडधान्ये, अंडी, पनीर, दही, हिरव्या पालेभाज्या, बिया आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *