Analogue Paneer Ban : ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?


मुंबई : आगामी सण-उत्सवांच्या तोंडावर अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) भेसळयुक्त अन्नपदार्थ बनवणाऱ्यांनाविरुद्ध आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांविरोधात एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. FSSAI ने एक नवीन मसुदा अधिसूचना (Draft Notification) जारी करत देशभरात ‘अ‍ॅनालॉग पनीर’ (Analog Paneer) च्या उत्पादन आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

यापूर्वी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांनी यावर बंदी घातली होती. मात्र, आता संपूर्ण देशात हा नियम लागू करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून पनीरच्या नावाखाली होणारा हा फसवणुकीचा खेळ कायमचा बंद होईल.

What is Analogue Paneer : काय आहे हे ‘अ‍ॅनालॉग पनीर’?

अ‍ॅनालॉग पनीर हे अस्सल किंवा नैसर्गिक पनीर नसून एक प्रकारचे बनावट किंवा कृत्रिम (Artificial) पनीर आहे. अस्सल पनीर तयार करण्यासाठी शुद्ध दुधाचा वापर केला जातो, मात्र अ‍ॅनालॉग पनीर बनवताना दुधाचा एक थेंबही वापरला जात नाही.

हे पूर्णपणे बिगर-डेअरी घटकांपासून बनते, जसे की स्वस्त वनस्पती तेल (Vegetable Oil), फॅट, स्टार्च आणि विविध प्रकारचे इमल्सीफायर्स (Emulsifiers) एकत्र करून ते तयार केले जाते. दिसण्यात आणि स्पर्शाने हे हुबेहूब खऱ्या पनीरसारखेच मऊ आणि पांढरे दिसते, ज्यामुळे सामान्य ग्राहकाला अस्सल आणि बनावट पनीरमधील फरक ओळखणे अशक्य होते.

FSSAI Reason : FSSAI यावर बंदी का घालत आहे?

बाजारपेठेत या स्वस्त कृत्रिम उत्पादनाची सर्रास विक्री खऱ्या डेअरी पनीरच्या नावाने केली जात आहे, हे या बंदीमागील सर्वात मोठे कारण आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्नकार्यांमध्ये खर्च वाचवण्यासाठी याच अ‍ॅनालॉग पनीरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि ग्राहकांना याची माहितीही नसते.

नवीन नियमांनुसार, आता कोणत्याही कंपनीला किंवा रेस्टॉरंटला अशा उत्पादनासाठी ‘पनीर’ (Paneer) हा शब्द वापरण्याची परवानगी नसेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

Analogue Paneer Health Hazards : आरोग्यासाठी किती घातक आहे हे पनीर?

अ‍ॅनालॉग पनीरच्या सेवनाने मानवी आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होतात. यामध्ये वापरले जाणारे सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅट आणि हायड्रोजनेटेड तेल शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) मोठ्या प्रमाणात वाढवतात. यातील ट्रान्स फॅट्स (Trans Fats) आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे अगदी कमी वयातच हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

नव्या नियमांनुसार, जर एखाद्या कंपनीने किंवा रेस्टॉरंटने बिगर-डेअरी पनीर वापरले, तर त्यांना त्यांच्या मेनू कार्डवर आणि पॅकेटच्या लेबलवर मोठ्या अक्षरांमध्ये ‘नॉन-डेअरी प्रोडक्ट’ (Non-Dairy Product) किंवा ‘अ‍ॅनालॉग’ (Analog) असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असेल.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *