Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं


नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतानं कबड्डीत दुसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या महिला संघानं पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं, त्यानंतर पुरुष कबड्डी संघानं देखील सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं अंतिम फेरीत इराणला 40-34  नं पराभूत केलं. अटीतटीच्या सामन्यात भारतानं इराणला पराभूत केलं. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इराण आघाडीवर होता, मात्र, भारतानं दुसऱ्या हाफमध्ये दमदार कमबॅक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 

इराणनं पहिल्या हाफमध्ये भारतावर 18-17 अशी आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या हापमध्ये भारतानं 23 गुण मिळवले तर इराणला 16 गुण मिळवता आले. दुसऱ्या हाफमध्ये भारतानं इराणला ऑलआऊट केलं. यामुळं ते दबावात दिसून आले. भारतानं या स्थितीचा फायदा घेतला, याशिवाय भारताच्या पुरुष संघाचा बचाव देखील दमदार होता.  

भारतानं मिळवलं चौथं सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत चार सुवर्णपदकं मिळवली आहेत. सर्वात पहिलं सुवर्णपदक भारताच्या महिला क्रिकेट संघानं मिळवलं होतं. त्यानंतर नेमबाजी मिश्रमध्ये भारतानं सुवर्णपदक जिंकलं. आज महिला कबड्डी संघानं आणि पुरुष कबड्डी संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे.  

कबड्डीत भारतानं मिळवलं नववे सुवर्ण

1990 ते 2026 दरम्यान 10 वेळा आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या, यापैकी 9 स्पर्धांमध्ये भारतानं कबड्डीत सुवर्णपदक मिळवलं आहे. 2018 मध्ये भारताच्या कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळवता आलं नव्हतं.  

भारताच्या महिला कबड्डी संघानं मिळवलं सुवर्णपदक

भारताच्या महिला कबड्डी संघानं देखील अंतिम सामन्यात इराणला 37-34 नं पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. हा सामना देखील अटीतटीचा झाला. सुरुवातीपासून दोन्ही संघ आक्रमकपणे खेळत होते. दुसऱ्या हाफमध्ये भारतानं बाजी मारली.  

भारताच्या खात्यात 28 पदकं

भारतानं आजपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत 4 सुवर्णपदकांसह 28 पदकं जिंकली आहेत. भारत पदतालिकेत 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताकडे 4 सुवर्णपदकांसह 11 रौप्य पदकं आणि 13 कांस्य पदकं आहेत. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 107 पदकं जिंकली होती. यावेळी भारताचं पथक आशियाई क्रीडा स्पर्धेत किती पदकं मिळवतं हे पाहावं लागेल. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *