200MP कॅमरा वाला Motorola Signature 27 फोन बाजारात येणार, पॉवरफुल Snapdragon चिपवर काम करणार – Marathi News | Motorola Signature 27 with a 200MP camera to launch; powered by a powerful Snapdragon chip.


मोटोरोलाने सिग्नेचर फोनला स्नॅपड्रॅगन समिट 2026 मध्ये लाँच केले आहे. हा हँडसेट ब्रँडच्या सिग्नेचर सिरीजचे दुसरे मॉडेल आहे. जो या वर्षांच्या सुरुवातीला मोटोरोला सिग्नेचर नंतर लाँच केला आहे. हा नवा फ्लॅगशिप क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम झेन 6 च्या चिपसेटसह घोषीत केलेल्या पहिल्या स्मार्टफोनपैकी एक आहे. यात 50-मेगापिक्सलचा सोनी LYTIA 910 मेन कॅमरा आणि 200-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. मोटोरोलाने Signature 27 च्यासह नाव ठेवण्याची नवी पद्धत आत्मसात केली आहे. यात फोनच्या नव्या जनरेशनची ओळख ठसवण्यासाठी येत्या वर्षातील शेवटच्या दोन क्रमांकाचा वापर केला आहे.

Motorola Signature 27 कलर ऑप्शन

मोटोरोलाने आतापर्यंत सिग्नेचर 27 च्या किंमत वा सेल डेटची खुलासा केलेला नाही. मात्र, कंपनीने दुजोरा दिला आहे की हा स्मार्टफोन या वर्षाच्या शेवटी जागतिक बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. Motorola Signature 27 दोन कलरमध्ये आला आहे. यात Pantone Coal Smoke आणि Pantone Capulet Green असे दोन कलर आहेत.

Motorola Signature 27 चे फिचर्स

मोटोरोला सिग्नेचर 27 क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम झेन 6 चिपसेटने सुसज्ज आहे. ज्याला स्नॅपड्रॅगन समिट 2026 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट झेन 6 सोबत सादर केले होते. कंपनीच्या मते हा चांगला ऑन-डिव्हाईस एआय, कॅमेरा परफॉर्मन्स, गेमिंग रिस्पॉन्सिव्हनेस सोबत येतो.

या फ्लॅगशिप मॉडेलमध्ये मोटोरोलाचा हा आर्कटिकमेश कुलिंग सिस्टीम देखील देण्यात आला आहे.या थर्मल सॉल्युशनमध्ये डायमंड-इन्फ्युज्ड थर्मल जेल, लिक्विड मेटल आणि कॉपर मेशला नव्या डिझाईनवाल्या 3डी वेपर चेंबरसह जोडले आहे. मोटोरोलाच्या मते हा वेपर चेंबर्स गेल्या पिढीच्या तुलनेत 40 टक्के मोठा आहे.

Motorola Signature 27 कॅमरा

या फोनच्या कॅमेऱ्याचा विचार करायचा झाला तर सिग्नेचर 27 मध्ये 50 मेगापिक्सलचा सोनी LYTIA 910 मुख्य कॅमरा आणि 200 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमरा दिला आहे. मोटोरोला आपल्या व्हिडीओ एन्हांसमेंटमध्ये इंजिन देखील सादर करत आहे. Google च्या Gemini मध्ये देखील AI फीचर्स उपलब्ध आहे. Signature 27 Gemini Omni ला सपोर्ट करेल. जे प्रॉम्प्ट, फोटो वा उपलब्ध व्हिडीओ फुटेजला एका तयार व्हिडीओमध्ये बदलू शकतो.

तुम्ही गुगलच्या Lyriaचा वापर करुन म्युझिक आणि साऊंडट्रॅक देखील बनवू शकतो. मोटोरोलाने सिग्नेचर 27 साठा सात वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेडचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन एंड्रॉयड 17 सह लॉन्च होईल. सिग्नेचर 27 मोटोरोलाचा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात बी एंड ओचा ऑडिओ सिस्टीम दिलेला आहे. कंपनीने आतापर्यंत हँडसेटची डिस्प्ले, बॅटरी क्षमता, चार्जिंग स्पीड, रॅम, स्टोरेज आणि इतर कॅमेरा सेंसरची माहिती उघड केलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *