चिंच पाहताच तोंडाला पाणी का सुटतं, 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण – Marathi News | Why does mouth water when seeing tamarind sour taste saliva science


चिंच हा शब्द नुसता उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटतं. हो ना? ही एक अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. लहानपणी शाळेबाहेर मिळणारी चिंच सगळ्यांनाच नक्की आठवत असेल. झाडावरची ती हिरवीगार चिंच बघून मोह आवरत नसे. मग ती चिंच दगड फेकून पाडण्याची मज्जा काही औरच असायची. ती आंबट-तुरट हिरवी चिंच आणि सोबत मीठ-तिखट… आहाहा, नुसती आठवण काढली तरी जिभेला पाणी सुटतं. त्यातच एखादी गोडसर ‘पाडाची चिंच’ हाती लागली, की आनंद गगनात मावत नसे. तसं पाहिलं तर चिंच सगळ्यांनाच आवडते. पण विशेषतः मुलींचा हा सर्वात आवडता आणि जिव्हाळ्याचा मेवा असतो.

या तोंडाला पाणी सुटण्यामागे एक छान विज्ञानही लपलेलं आहे. आपण जेव्हा पहिल्यांदा चिंच खातो, तेव्हा तिची ती खास आंबट चव आपला मेंदू कायमची लक्षात ठेवतो. त्यामुळेच, नंतर चिंच नुसती दिसली, तिचा वास आला किंवा तिच्याबद्दल विचार जरी केला, तरी मेंदूला वाटतं की आता आपण नक्की आंबट काहीतरी खाणार आहोत. मग तो लगेच तोंडातील लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींना कामाला लावतो. आणि बघता बघता तोंडात लाळ जमा होऊ लागते.

चिंचेमध्ये नैसर्गिकरित्या आंबटपणा खूप जास्त असतो. या तीव्र आंबटपणापासून आपल्या दातांचे आणि तोंडाचे रक्षण करण्यासाठी शरीर मुद्दाम जास्त लाळ तयार करते. या लाळेमुळे तो आंबटपणा थोडा सौम्य होतो. तसंच, लाळ ही आपल्या पचनक्रियेची एकदम पहिली पायरी असते. म्हणजे, चिंच प्रत्यक्ष पोटात जाण्याआधीच आपलं शरीर ती पचवायची तयारी सुरू करतं.

फक्त कच्ची चिंचच नाही, तर तिच्यापासून बनलेले अनेक पदार्थही खूप फेमस आहेत. आपण ते नेहमी आवडीने खातो. चिंचेची गोळी, आंबट-गोड कँडी, भाजलेले चिंचोके, चिंच-गुळाची चटणी सगळंच एकदम भारी. आणि हो, सगळ्यांची लाडकी पाणीपुरी कशी विसरून चालेल. पाणीपुरीच्या त्या तिखट-गोड पाण्यातला चिंचेचा अर्कच तर त्याची खरी जान असतो.

थोडक्यात सांगायचं तर, चिंच पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणं ही नुसती सवय नाही. ती आपल्या शरीराची, मेंदूची आणि बालपणीच्या गोड-आंबट आठवणींची एक अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *