Maharashtra Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर, मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर


Maharashtra Vidhan Parishad Election: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी (Counting of Votes) होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक (Election Schedule) प्रसिद्ध केले आहे.

Election Schedule: निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026 

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026

अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026

मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)

मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026

Maharashtra Vidhan Parishad Election: रिक्त झालेल्या जागा

1. औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)

2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)

3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)

4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)

5 पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)

Maharashtra Vidhan Parishad Election: प्रमुख मतदारसंघांतील राजकीय समीकरणे 

1. औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघ 

2020 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी 1,16,638 मते मिळवून भाजपचे शिरीष बोराळकर (58,743 मते) यांचा 57,895 मताधिक्याने पराभव केला होता. सतीश चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय होता.

2020 च्या तुलनेत यंदा राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. यावेळी या मतदारसंघात सुमारे 2 लाख 92 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. भाजपने यंदा पूर्ण ताकदीने तयारी सुरू केली असून एम. के. देशमुख आणि किरण पाटील यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

2. नागपूर पदवीधर मतदारसंघ 

तब्बल 58 वर्षे जनसंघ आणि भाजपचा बालेकिल्ला राहणाऱ्या आणि गंगाधरराव फडणवीस तसेच नितीन गडकरी यांसारख्या मातब्बर नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात 2020 मध्ये काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा 18,910 मतांनी पराभव करून इतिहास रचला होता.

आपला गमावलेला गड परत मिळवण्यासाठी भाजपने जोरदार मतदार नोंदणी मोहीम राबवली आहे. भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि माजी आमदार अनिल सोले हे दोघेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर ‘शिक्षक भारती’ने इंजिनिअर अतुल देशमुख यांची उमेदवारी महिनाभरापूर्वीच जाहीर करून लढत त्रिकोणी केली आहे.

आणखी वाचा 

Dhirendra Shastri: बागेश्वर बाबांनी पर्चीवर ‘पुत्रयोग’ लिहिला, पण चौथ्यांदाही झाली मुलगी; धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं 1 कोटींचं आव्हान, नेमकं प्रकरण काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *