iphone Update: एकाच फोनमध्ये तीन WhatsApp, सर्वात भन्नाट फिचर आले, वाचा कोणाला फायदा, कसा? – Marathi News | Whatsapp three accounts on iphone one phone three whatsapp accounts personal work business feature coming soon ios update


सगळीकडे आयफोनची हवा पसरली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात आयफोन बघायला मिळतोच. एक पर्सनल, दुसरा ऑफिसचा आणि तिसरा बिझनेससाठी अशा पद्धतीने तीन नंबर वापरणाऱ्यांची चांगलीच कसरत होते. तर कधी कधी Whatsapp Business चा आधार घ्यावा लागतो. पण आता iPhone यूजर्सची ही कसरत कमी होणार आहे. कारण Whatsapp च्या एका अपडेटमुळे iPhone यूजर्सना एका फोनमध्ये तब्बल Whatspapp चे तीन अकाउंट उघडता येणार आहे.

iphone केव्हा सुरू करणार ही सुविधा

२०२६ मध्ये Whatsapp ने iPhone वर एकाच अॅपमध्ये दोन अकाउंट्समध्ये वापरण्याची सुविधा सुरू केली . त्यामुळे पर्सनल आणि ऑफिसचे नंबर वेगवेगळे ठेवण्यासाठी दुसरा फोन बाळगण्याची गरज कमी झाली. आता याच मल्टी – अकाउंट फिचरचा विस्तार करून तिसरं अकाउंट जोडण्याची तयारी सुरू करण्याच आली आहे.

एका फोनमध्ये तीन नंबर, तीन अकाउंट्स

हे फिचर iphone मधे उपलब्ध झाल्यास यूजर्स लवकरच Whatsapp मध्ये तीन वेगवेगळे अकाउंट्स जोडू शकतील. उदा. एक नंबर पर्सनल वापरासाठी, दुसरा ऑफिससाठी आणि तिसरा बिझनेससाठी किंवा इतर कामासाठी वापरता येऊ शकतो. त्यामुळे तीन Whatsapp अकाउंट्ससाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करण्याची गरज कमी आहे.

अकाउंट बदलायचं कसं

हे फिचर बदलण्याची पद्धत ही नेहमीच्या अकाउंट्स स्वीच सारखीच आहे. Whatsapp च्या सेटिंग्समध्ये अकाउंट लिस्टमधून संबंधित अकाऊंट निवडून त्यावर स्विच करता येईल. प्रत्येक अकाउंटच नाव प्रोफाईल फोटो आणि फोन नंबर वेगळा दिसेल. तसेच अॅक्टिव्ह अकाऊंट ओळखण्यासाठी काही वेगळी चिन्हही असतील.

तीन अकाउंट्सचा डेटा मिळणार नाही

या फिचरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही अकाउंट्सचा डेटा वेगळा ठेवला जाणार आहे. प्रत्येक अकाउंट्सची चॅट, हिस्ट्री , नोटिफिकेशन, बॅकअप, मीडिया आणि प्रायव्हसी सेंटिग्स स्वतंत्र असणार आहेत. त्यामुळे एका नंबरची माहिती दुसऱ्या अकाउंटमध्ये मिसळण्याची शक्यता कमी राहिल. काही iPhone मध्ये हे अपडेट सुरू झाले आहे. काही iPhone मध्ये हे फिचर प्रोसेसमध्ये आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *