Gauri Visarjan 2026 : सध्या आपल्याला सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2026) धामधूम पाहायला मिळतेय. त्यानुसार, आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस आहे. घरोघरी गणपती आणि गौरी आवाहन झाल्यानंतर आज गौरी-गणपती विसर्जन काही ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपल्या गौराईचं विसर्जन (Gauri Visarjan) अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी प्रत्येकाच्याच घरी लगबग पाहायला मिळतेय. मात्र, गौरी विसर्जनाच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. गौरी विसर्जन करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली किंवा काही नियम पाळले तर नक्कीच गौरी विसर्जन चांगलं पार पडेल.
गौरी विसर्जनाचा मुहूर्त (Gauri Visarjan Muhurta 2024)
गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, आज 19 सप्टेंबर 2026 रोजी सूर्योदयापासून ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत गौराईचं विसर्जन करण्याचा उत्तम काळ आहे. शास्त्रानुसार, सकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 38 चा काळ चांगला आहे. मात्र, दुपारी मूळ नक्षत्राच्या समाप्ती आधी म्हणजेच 3 वाजून 15 मिनिटांपर्यंतची वेळ शुभ मानली जाते.
गौरी विसर्जन करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
- गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. लक्षात ठेवा गौरीची पूजा ही गौरीचे आभार मानण्यासाठी आणि गौरीला निरोप देण्यासाठी केली जाते.
- गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, नारळ, सुपारी, अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ अर्पण करावेत.
- गौरी विसर्जनाच्या वेळी 5 सौभाग्यवती महिलांना बोलावून थाळीचे वाण दिले जाते. आधी ताट देवीसमोर दाखवावे नंतर त्याची पूजा करावी.
- गौरीची आरती झाल्यानंतर देवीवर अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. सोबतच विडा द्यावा.
- गौरी मुखवट्याच्या म्हणजेच पंचधातूंच्या, सोन्या-चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन करावे.
- देवीच्या विसर्जनानंतर त्यातली थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा चौथा आठवडा कसा असणार? कोणत्या राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य