मुलाला वडिलोपार्जीतचं सोनं मिळालं, पण बायकोला आयफोन घेण्यासाठी विकून टाकलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


iPhone 18  Pro Max : आयफोन 18 प्रो मॅक्सला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयफोन 18 प्रो मॅक्स लॉन्च झाल्यापासून सर्वांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 18 सप्टेंबरपासून, आयफोन 18 प्रो खरेदी करण्यासाठी ॲपलच्या शोरुममध्ये सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे.पत्नीला आयफोन 18 प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी पतीनं वडिलोपार्जित सोने विकले आहे. 

सोशल मीडियावर तरुणाने नेमका काय केलाय दावा?

दरम्यान, सध्या दिल्लीतील एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नीसाठी नवीन आयफोन 18 प्रो मॅक्स खरेदी केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, त्याने आपल्या कुटुंबाकडून वारसा हक्काने मिळालेल्या काही जुन्या सोन्याच्या वस्तू विकून हा फोन खरेदी केला आहे. त्या तरुणाचा दावा आहे की, हे सोने त्याला त्याच्या कुटुंबाच्या आधीच्या पिढ्यांकडून वारसा हक्काने मिळाले आहे. त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले काही सोने विकून त्याने आपल्या पत्नीसाठी फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असा त्याचा दावा आहे.

हर्ष गोएंका यांनी शेअर केला व्हिडिओ

राष्ट्रीय उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडिओ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर आपले मत व्यक्त करताना हर्ष यांनी स्पष्ट केले की, काही लोक घर घेण्यासाठी आपले सोने विकतात, तर काही जण आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलतात. या प्रकरणात, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी फोन खरेदी करण्याकरिता आपल्या वडिलोपार्जित कुटुंबाचे सोने विकणे योग्य मानले. गोएंका यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली. काहींच्या मते त्यांनी हे पाऊल प्रेमापोटी उचलले, तर काहींच्या मते एवढ्या महागड्या फोनसाठी स्वतःचे वडिलोपार्जित सोने विकणे समर्थनीय नाही. काहींनी असेही म्हटले की, जर तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करणार असाल, तर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

आयफोन 18 प्रो ची किंमत किती ? 

भारतात आयफोन 18 प्रो ची किंमत 1 लाख 64,900 पासून सुरू होते, तर आयफोन 18 प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 79,900 आहे. नवीन प्रो मॉडेलमध्ये 48MP फ्यूजन मेन कॅमेरा, कमी प्रकाशात फोटो आणि व्हिडिओ काढण्याची सुधारित क्षमता आणि जास्त बॅटरी लाईफ ही वैशिष्ट्ये आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *