नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अध्यक्षपदावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यश डबास विजयी झाले. तर, उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीन विजयी झाले. त्यांनी एनएसयूआय आणि अभाविपच्या उमेदवारचा पराभव केला. सचिव आणि संयुक्त सचिव पदाव देखील अभाविपनं बाजी मारली. म्हणजेच चार पैकी तीन महत्त्वाची पदं अभाविपनं मिळवली आहेत. उपाध्यक्षपद अपक्षाकडे गेलं आहे.
अध्यक्षपद अभाविपकडे
अध्यक्ष पदासाठी अभाविपचे यश डबास आणि एनएसयूआयचे विजय मीणा यांच्यात प्रमुख लढत झाली. अभाविपच्या यश डबास यांना 24,576 मतं मिळाली. तर, एनएसयूआयच्या विजय शंकर मीणा यांना 22,523 मतं मिळाली. अनन्या रतूड़ी यांना 5,377, समीर कुमार याला 1,015, अश्मित कुमार ला 1,388, एजाज मन्सुरीला 837आणि समर्थ बेनिवाल यांना 819 मतं मिळाली. NOTA ला 4,310 मतं मिळाली. एकूण मतदान 60,845 इतकं झालं.
उपाध्यक्षपदी अपक्ष दीपांशू शौकीन विजयी
उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीन यांनी विजय मिळवला, त्यांना 30,615 मतं मिळाली. इशु मौर्यला 16,910 तर वीर छत्रथ ला 4,313 मतं मिळाली. अरन्या सिंह राठोडला 2,274 आणि अक्षत शिखरला 2,383 मतं मिळाली. तर, नोटाला 4,359 मतं मिळाली आहेत. या पदासाठी एकूण मतदान 60,854 इतकं झालं. दीपांशू शौकीन हे मूळचे एनएसयूआयचे असून त्यांनी उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष अर्ज भरला होता.
सचिव पदावर रिया छावडी विजयी
सचिव पदावर अभाविपच्या रिया छावडी विजयी झाल्या त्यांना 21,650 मतं मिळाली. NSUI च्या नम्रता चौधरी यांना 14,869 मतं मिळाली. पंकज कुमार यांना 7,639 आणि स्टॅनजिन डेस्कयॉन्ग यांना 8,734 मतं मिळाली. तर तब्बल 7,884 विद्यार्थ्यांनी NOTA ला मतदान केलं. एकूण मतदान 60,776 इतकं झालं.
संयुक्त सचिव पदावर अभाविपचा विजय
संयुक्त सचिव पदावर देखील अभाविपच्या लक्ष्य राज सिंह यांनी विजय मिळवला.त्यांना 16,615 मतं मिळाली. तर, अपक्ष उमेदवार विशेष यादवला 15,778 मतं आणि NSUI च्या गोपाळ चौधरींना 15,206 मतं मिळाली. बी परिजात यांना 5,837 मतं मिळाली. तर नोटाला 7,389 मतं मिळाली. या पदासाठी 60,825 मतं मिळाली.
18 सप्टेंबरला मतदान
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी 17 सप्टेंबरला मतदान झालं होतं. मतदानाची टक्केवारी 40.46 टक्के होती. दिल्ली विद्यापीठाच्या स्पोर्टस स्टेडियममधील मल्टीपर्पज हॉलमध्ये मतदान झालं. मतमोजणी दीड तास उशिरानं सुरु झाली. प्रमुख चार पदांचे निकाल जाहीर झाले असून अभाविपनं तीन पदांवर विजय मिळवला तर एका जागेवर अपक्षानं बाजी मारली. या निवडणुकीत प्रमुख लढत अभाविप आणि एनएसयूआय यांच्यात झाली.
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन