BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?


BJP Parag Shah: जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असा लौकिक असलेल्या भाजपचे आमदार पराग शाह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पराग शाह ( MLA Parag Shah) हे भिकाऱ्याच्या (Beggar) वेषात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला अनेकांना धक्का बसला होता. मात्र, नंतर या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. पराग शाह यांनी जैन (Jain) धर्मगुरुंच्या सांगण्यावरुन एक दिवस भिकारी म्हणून व्यतीत केला. (Maharashtra Politics news)

पराग शाह हे मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. तब्बल 3000 हजार कोटींचे मालक असलेले घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा एक दिवस घाटकोपरच्या रस्त्यावर भिकारी बनून फिरले, मात्र त्यांना कोणी ओळखू शकले नाही. सध्या जैनधर्मियांचा चातुर्मास सुरू आहे. पराग शहा यांचे गुरु नम्रमुनी यांनी पराग शहा यांना एक दिवस भिकारी बनण्याचा अनुभव घ्यावा असे सुचवले. गुरुंच्या या आदेशाचे पालन करीत कोट्यधीश असलेल्या आमदार पराग शहा यांनी सर्व सुरक्षाव्यवस्था, गाड्या आणि महागड्या वस्तू दूर करून भिकाऱ्याचा वेष धारण केला. ते काही तास घाटकोपरमधील रस्त्यांवर भिकारी होऊन फिरले. त्यांनी भीक मागून खाल्ले, भिकाऱ्यासारखे रस्त्यावर कडेला बसून राहिले आणि भिकारी होण्याचा अनुभव घेतला. त्यांनी हा अनुभव त्यांचे गुरु आणि लोकांसमोर देखील मांडला. ते ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी मेकअप काढून पुन्हा गेले आणि त्या त्या लोकांशी पुन्हा चर्चा केली. चित्रपटात शोभावा असा या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पराग शाह यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये तब्बल 3383 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती घोषित केली होती. ज्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. पाच वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती 500 कोटी होती. ही संपत्ती पाच वर्षात सहापटीने वाढून 3000 कोटींवर गेली होती.  पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय आहेत. पराग शाह महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिले आहेत. 

आणखी वाचा

VIDEO : भाजप आमदाराने रिक्षा चालकाला कानफटीत मारलं, घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं?

Parag Shah: 500 कोटीचे 3300 कोटी कसे झाले,  महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाहांनी लेखाजोखा मांडला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *