Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण! घसरणीमागील मुख्य कारणे समोर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर


Gold Silver Rate: भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. सोने चांदीचे भाव आज काहीसे घसरले आहेत. काल (बुधवारी, ता 9) वायदा बाजारात सोन्याच्या (Gold Silver Rate) किमतीत 190 रुपयांपर्यंतची तेजी पाहायला (Gold Silver Rate) मिळाली होती. मात्र, आज 10 सप्टेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे.(Gold Silver Rate)

Gold Silver Rate: सोन्याचे आजचे दर

‘गुडरिटर्न्स’च्या (Goodreturns) अहवालानुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,54,300 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 10 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील कालच्या तुलनेत 10 रुपयांनी घसरून आज 1,41,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,15,720 रुपये असून यातही 10 रुपयांची कपात झाली आहे.(Gold Silver Rate)

Gold Silver Rate: प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम):

दिल्ली – 15,445 रुपये
मुंबई – 15,430 रुपये
बेंगळुरू – 15,430 रुपये
चेन्नई – 15,430 रुपये
कोलकाता – 15,430 रुपये
पुणे – 15,430 रुपये
जयपूर – 15,556 रुपये
लखनौ – 15,556 रुपये
पाटणा – 15,556 रुपये

Gold Silver Rate: आज सोन्याच्या किमती का घसरल्या?

आंतरराष्ट्रीय बाजारात नफा वसुली (Profit Booking) आणि विक्री वाढल्यामुळे सोन्याच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. सध्या जागतिक गुंतवणूकदार अत्यंत सतर्क भूमिका घेत आहेत, कारण सर्वांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) आगामी बैठकीतील व्याजदरांच्या निर्णयाकडे लागले आहे. व्याजदरातील संभाव्य बदलांच्या अनिश्चिततेमुळे ट्रेडर्स सोने-चांदीतील पैसा काढून सुरक्षित पर्यायांचा शोध घेत आहेत. अमेरिकन फेड रिझर्व्हची पुढील बैठक 15 आणि 16 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

याशिवाय, ‘डॉलर इंडेक्स’मधील (Dollar Index) मजबुती हेदेखील सोन्याचे दर घसरण्याचे एक मोठे कारण आहे. जेव्हा जेव्हा अमेरिकन डॉलर मजबूत होतो, तेव्हा जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो. डॉलर मजबूत झाल्याने इतर चलनांचा वापर करणाऱ्यांसाठी सोने खरेदी करणे महाग होते, ज्यामुळे तात्पुरती मागणी घटते.

तसेच, सोने ही एक ‘नॉन-यील्डिंग ॲसेट’ (Non-Yielding Asset) आहे, म्हणजेच यावर बँकेच्या एफडी किंवा सरकारी बाँड्सप्रमाणे कोणताही निश्चित व्याज किंवा लाभांश (Dividend) मिळत नाही. त्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यावर गुंतवणूकदार सोने विकून आपला पैसा काढून घेतात.

Gold Silver Rate:  आजचा चांदीचा भाव

आज भारतात चांदीचा दर 249.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 2,49,900 रुपये प्रति किलोग्राम इतका आहे. आज चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 0.10 पैशांची घसरण झाली असून, त्यानुसार प्रति किलोचा भाव 100 रुपयांनी कमी झाला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, वडोदरा आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये आज चांदीचा दर प्रति 10 ग्रॅम 2,499 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर किंचित जास्त म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 2,549 रुपये नोंदवला गेला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *