iPhone Duo Marathi News: ॲपलने अखेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे आपले नवे प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले आहेत. Apple चा बहुप्रतिक्षित फोल्डेबल फोन देखील अखेर लाँच (Foldable iPhone) करण्यात आला आहे. या फोनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध चर्चा सुरू होत्या. अखेर कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Duo या नावाने सादर केला आहे. हा फोन अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की, फोन बंद असताना वापरकर्त्यांना कॉम्पॅक्ट iPhone चा अनुभव मिळेल, तर फोन उघडल्यानंतर मोठ्या डिस्प्लेचा फायदा घेता येईल. मल्टीटास्किंग, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी हा फोन उत्तम अनुभव देईल, असा कंपनीचा दावा आहे. (iPhone Duo Marathi News)
iPhone 18 Pro vs iPhone 18 Pro Max vs iPhone Duo pic.twitter.com/LEVPDRhNO3
— Apple Hub (@theapplehub) September 9, 2026
दमदार कॅमेरा सेटअप- (Foldable iPhone Duo Camera)
iPhone Duo च्या कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीने या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याऐवजी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सेलचा Fusion Main कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा Fusion Ultra Wide कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या फोनमध्ये Apple Intelligence आणि Siri AI चा सपोर्टही मिळतो. या फीचर्सच्या माध्यमातून Apple वापरकर्त्यांना अधिक वैयक्तिक आणि स्मार्ट अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.
iPhone Duo चे जबरदस्त फीचर्स- (Foldable iPhone Duo Features)
iPhone Duo ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचा फोल्डेबल डिस्प्ले. या फोनमध्ये कंपनीने 7.6 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले दिला आहे. इतक्या मोठ्या आकाराचा डिस्प्ले यापूर्वी कोणत्याही iPhone मध्ये देण्यात आला नव्हता. फोनच्या बाहेरील बाजूस 5.4 इंचाचा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. दोन्ही डिस्प्लेमध्ये ProMotion, Always-On Display आणि आउटडोअरमध्ये 3,000 निट्सपर्यंत ब्राइटनेस सपोर्ट मिळतो. याशिवाय, फोनला IP68 रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोल्डेबल फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल.
This is the iPhone Duo, starting at $1,999 #AppleEvent pic.twitter.com/5VithPkI5v
— Apple Hub (@theapplehub) September 9, 2026
दमदार प्रोसेसर आणि बॅटरी- (Foldable iPhone Duo Battery)
iPhone Duo मध्ये Apple चा नवीन A20 Pro चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये कस्टम व्हेपर चेंबर देखील देण्यात आले असून, त्यामुळे फोन गरम होण्यापासून बचाव करण्यास मदत होईल. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल-बॅटरी सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन वापरकर्त्यांना सुमारे 24 तासांचा बॅटरी बॅकअप देण्यास सक्षम असेल.
भारतात iPhone Duo ची किंमत किती? ((iPhone Duo Price Details)
Apple iPhone Duo ची भारतातील सुरुवातीची किंमत 2 लाख 99 हजार 900 रुपये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोन 256GB ते 2TB पर्यंतच्या स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने हा फोन Star White आणि Night Sky या दोन रंगांमध्ये सादर केला आहे. या फोनची प्री-ऑर्डर 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर 23 ऑक्टोबरपासून विक्रीला सुरुवात होईल.
फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Duo ची भारतातील किंमत- (iPhone Duo Price Marathi News)
- 256GB – ₹2,99,900
- 512GB – ₹3,24,900
- 1TB – ₹3,74,900
- 2TB – ₹4,49,900
फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात Apple ची मोठी एंट्री- (iPhone Duo Marathi News)
iPhone Duo च्या माध्यमातून Apple ने फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आपली पहिली उपस्थिती नोंदवली आहे. मोठा डिस्प्ले, प्रीमियम डिझाइन, A20 Pro चिप आणि iOS 27 मधील नवीन फीचर्समुळे हा फोन कंपनीच्या सध्याच्या iPhone मॉडेल्सपेक्षा वेगळा ठरतो. जवळपास 3 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येणारा हा फोल्डेबल iPhone ग्राहकांमध्ये कितपत लोकप्रिय ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी: