नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी…. – Marathi News | Mahant Shivaji Maharaj of Narayan Gad to meet Manoj Jarange.


मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला ११ दिवस झाले असून आता एक महत्वाची घडामोड घडली आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. गेल्या दीड तासांपासून नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार राजेश विटेकर यांची जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे.

मराठी आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरु केले आहे. गॅझेट नोंदीनुसार ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप जारी करावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांच्या मागणीनंतर राज्य सरकारच्या वतीने कोणाच्या दुसऱ्या ताटातील हिसकावून दिले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. आज नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी जरांगेच्या उपोषण स्थळाला भेट दिली आहे. गेल्या दीड तासांपासून जरांगे यांच्यासोबत नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज चर्चा करत आहेत. त्यांच्या सोबत आमदार विजयसिंह पंडित, आमदार राजेश विटेकर देखील हजर आहेत.

मनोज जरांगे यांच्याशी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज चर्चा करत आहेत. त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत जरांगे यांच्याशी चर्चा सुरु आहे. महंत शिवाजी महाराज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जालना ब्रेक- मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही तसे सरकारचे प्रयत्न सुरु, मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा झाली – आमदार विजयसिंह पंडित.

आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार राजेश विटेकर यांची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तब्बल अडीच तास झाली चर्चा आहे.  यातून मार्ग काढायचा कसा काढायचा याबाबत चर्चा करण्यात आली आहे.  जरांगे यांनी  तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली. मार्ग काढण्यासाठी निश्चितपणे चर्चा करणार असे आमदार विजयसिंह पंडित (अजित पवार गट) यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *