तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? लेस्बियन महिलांना मारहाण; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा… – Marathi News | Sandeepa virk breaks silence on dark side of tihar jail and Lesbian women relationship


झगमनत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्याच्या रॉयल आणि आलिशान लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. पण कधीतरी त्यांच्या आयुष्यात एक भयानक वळण येतं आणि सर्वकाही होत्याचं नव्हतं होतं. असंच काही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टारमुळे झालं आहे. अभिनेत्री मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तब्बल चार महिने तुरुंगवास भोगला. तेव्हा तुरुंगात अभिनेत्रील अनेक भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत अभिनेत्रीला तुरुंगात महिलांवर बळजबरी होता का? असा प्रश्न विचारण्यात आला? यावर मोठा खुलासा करत अभिनेत्री लेस्बियन महिलांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संदीपा विर्क आहे. सांगायचं झालं तर, संदीपा विर्कला मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात काही महिने तुरुंगवास भोगावा लागलेला. पण एका पॉडकास्टमध्ये संदीपाने तिहार तुरुंगातील वास्तव सांगितलं. तिथे समलिंगी संबंध म्हणजे लेस्बियन रिलेशनशिप्स होतात का? असं विचारलं असता अभिनेत्री काय म्हणाली ते जाणून घ्या.

अभिनेत्री म्हणाली, “महिलांच्या तुरुंगात लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कोणावरही सक्ती केली जात नाही. मात्र, तिहार तुरुंगातील समलिंगी लैंगिक संबंधांबद्दल मी खूप काही ऐकलं आहे. तिथे अनेक महिला वर्षानुवर्षे राहत आहेत; जर एखादी महिला समलिंगी संबंधांकडे वळली, तर वॉर्डन येऊन तिला लाठीने मारहाण करते.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर कोणती महिला समलिंगी आहे, तर त्यावर काय करणार. मी लेस्बियन कायद्याचं समर्थन करत नाही. पण कोणाला एखाद्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असेल तर, त्यामध्ये वाईट काय आहे …’ संदीपाने सांगितल्यानुसार, तुरुंगातील भारतीयांवर अत्याचार केले जातात, तर नायजेरियन कैद्यांना मात्र त्यांच्या गरजेच्या सर्व गोष्टी मिळतात.

नायजेरियन कैद्यांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘तुरुंगातील महिला अधिकारीही त्या नायजेरियन कैद्यांना घाबरतात. त्यांना त्यांची भीती वाटते. अशात, ते त्यांचा सर्व राग केवळ आमच्यावरच काढतात.” या मुलाखतीत संगीता विर्क हिने तुरुंगातील निकृष्ट दर्जाचे अन्न आणि अस्वच्छ शौचालयांबद्दलही मोठा खुलासा केला. परिस्थिती इतकी बिकट होती की, अभिनेत्रीने आयुष्यात टोकाचा निर्णय घेण्याचा देखील विचार केलेला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *