India vs Afghanistan T20 Series Wrong Map Controversy : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या मालिकेत टीम इंडिया आपल्या घरच्या मैदानावरच पाहुण्या संघाच्या भूमिकेत खेळताना दिसणार आहे. दिल्लीमध्ये या मालिकेचं आयोजन करण्यात आलं असून, विशेष म्हणजे मालिकेच्या यजमानपदाची जबाबदारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (ACB) आहे. भारताने अफगाणिस्तानला ही मालिका आपल्या देशात आयोजित करण्यासाठी सहकार्य केलं असतानाच, अफगाण बोर्डाच्या एका कृतीमुळे मात्र नवा वाद निर्माण झाला आहे. मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये चुकीचा नकाशा
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेली टी-20 मालिका 13 सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठीचा एक व्हिडिओ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दोन्ही देशांचा वारसा, वैशिष्ट्ये आणि काही ऐतिहासिक शहरांची झलक दाखवण्यात आली आहे. व्हिडिओच्या शेवटच्या भागात अफगाणिस्तान आणि त्यानंतर भारताचा नकाशा दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खरंतर, भारताचा नकाशा दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आला आहे. पहिल्या भारतीय नकाशात संपूर्ण जम्मू आणि काश्मीर आणि लडाख भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. मात्र, पुढच्याच क्षणी नकाशातून पाकिस्तान-व्याप्त काश्मीर काढून टाकण्यात आले आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. इतकेच नाही, तर सुरुवातीला दाखवलेला संपूर्ण नकाशा देखील जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि पाकव्याप्त काश्मीर या तीन भागांमध्ये विभागलेला आहे.
A series the nation has been eagerly awaiting. 🤩
A series that will once again bring together two nations with deep-rooted history, culture, and a shared passion for the game.🤜🤛
These are more than just matches. They are encounters of passion, excitement, and significance,… pic.twitter.com/Q8h7MYX1yf
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 6, 2026
व्हिडिओ हटवण्याची भारतीय चाहत्यांची मागणी
हा व्हिडिओ समोर आल्यापासून, भारतीय चाहत्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या पोस्टवर आपला आक्षेप, नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, पोस्ट टाकून 24 तासांहून अधिक वेळ उलटला असूनही, एसीबीने ती काढलेली नाही. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा भारत सरकार अफगाण अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उपस्थित करेल का, असा प्रश्न निर्माण होतो.
हे ही वाचा –