‘धुरंधर’ला धोबीपछाड! 4 दिवसांत नंबर 1 ठरला 2 तास 38 मिनिटांचा हा चित्रपट – Marathi News | Dhanush movie kara beats ranveer singh dhurandhar on netflix top 10 trending movies list


नंबर 1 ठरला 2 तास 38 मिनिटांचा हा चित्रपट
Image Credit source: Instagram

आदित्य धर दिग्दर्शित 2025 मधील सर्वांत मोठा चित्रपट ‘धुरंधर’ सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आणि याच कारणामुळे रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आतापर्यंत नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत कायम होता. ‘धुरंधर’ बऱ्याच काळापर्यंत नेटफ्लिक्सवर नंबर वन राहिली. मात्र आता नुकत्याच ओटीटी वर आलेल्या एका चित्रपटाने ‘धुरंधर’ला मागे टाकलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘कारा’.

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषची मुख्य भूमिका असलेल्या ‘कारा’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. प्रदर्शित होताच हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंगमध्ये पोहोचला आहे. ‘कारा’ने फक्त चार दिवसांत रणवीरच्या ‘धुरंधर’ला मागे टाकलं आहे. हा तमिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘कारा’ हा चित्रपट 28 मे 2026 रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला. 2 तास 38 मिनिटांच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या चारच दिवसांत टॉप ट्रेंडिंगच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर ‘धुरंधर’ हा चित्रपट आता थेट नवव्या स्थानी पोहोचला आहे. ‘धुरंधर : रॉ अँड अनदेखा’ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नेटफ्लिक्सवरील टॉप ट्रेंडिंगमधील चित्रपट

चित्रपटाची कथा

‘कारा’ या चित्रपटाची कथा एका चोरीवर आधारित आहे. यामध्ये धनुष मुख्य भूमिकेत आहे. कथा, स्क्रिनप्ले, संवाद आणि ट्विस्ट यांचं उत्तम मिश्रण या चित्रपटात पहायला मिळतं. या चित्रपटात धनुषसोबतच ममिता बैजू, केएस रविकुमार आणि सूरज वेंजारामुडू यांसारख्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

आयएमडीबी रेटिंग

या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 7.3 रेटिंग मिळाली आहे. धनुष हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने याआधीही अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘कारा’ हा त्याच्या करिअरमधील आणखी एक हिट चित्रपट सिद्ध होत आहे. जर तुम्हाला अॅक्शन, थ्रिलर आणि स्मार्ट चोरीच्या कथा आवडत असतील तर ‘कारा’ हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडू शकेल. या चित्रपटाच्या कथानकात भरभरून ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. संपूर्ण वेळ हा चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *