Lionel Messi Retirement News : फुटबॉल प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची आणि काहीशी भावनिक बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. लिओनेल मेस्सीने अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. मेस्सीने आपल्या निवृत्तीबाबत तीन पानांचे पत्र लिहलं आहे. याद्वारे त्यांनी आपली निवृत्तीची घोषणा केली आहे.
कर्तुत्वाच्या जोरावर मेस्सीनं अर्जेंटिनाचं नाव जगभरातील प्रत्येक घरात पोहोचवलं
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या चाहत्यांसाठीहा मोठा धक्का आहे. कारण मेस्सीने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबत त्याने एक पत्र जाहीर केलं आहे. या पत्राद्वारे त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. जगाच्या पाठीवर अर्जेंटिनाची सर्वात मोठी ओळख म्हणजे, लियोनेल मेस्सी होती. अर्जेंटिनातील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, ज्यानं आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर अर्जेंटिनाचं नाव जगभरातील प्रत्येक घरात पोहोचवलं आहे.
हीच योग्य वेळ असल्याचा पत्रात उल्लेख
मेस्सीच्या अचानक निवृत्तीने फुटबॉल जगताला धक्का बसला. जुलैमध्ये संपन्न झालेल्या 2026 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत मेस्सीचा अर्जेंटिना संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण स्पेनकडून त्यांचा पराभव झाला. आपल्या निवृत्तीबद्दल मेस्सीने लिहिले आहे की, अंतिम सामन्यानंतर बराच काळ विचार करून आणि वेळ घालवल्यानंतर, मला सर्वांना कळवायचे आहे की मी राष्ट्रीय संघातून निवृत्त होत आहे. हा एक असा निर्णय होता ज्यामुळे मला खूप दुःख झाले आणि अजूनही होत आहे, पण मला विश्वास आहे की हीच योग्य वेळ आहे.
शपथ घेऊन सांगतो, मी खेळासाठी माझे सर्वस्व दिले
मी शपथ घेऊन सांगतो की, मी खेळासाठी माझे सर्वस्व दिले आहे. केवळ गेल्या काही वर्षांत जेव्हा आम्ही सर्व काही जिंकलो तेव्हाच नाही, तर त्याआधीही. मी नेहमीच या जर्सीसाठी लढलो आणि फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हाला आनंद देण्यासाठी व अर्जेंटिनियन असल्याचा अभिमान वाटावा यासाठी माझे सर्वस्व दिल्याचे मेस्सीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने ऑगस्ट 2005 मध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीत 207 सामने खेळून 125 गोल केले. त्याने 68 गोलसाठी सहाय्यही केले. मेस्सी एकूण 17120 मिनिटे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळला. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने 2022 चा फिफा विश्वचषक जिंकला. त्याच्या विश्वचषक कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, मेस्सीने एकूण 34 सामने खेळून 21 गोल केले.