धाड.. धाड कोसळणार सोन्याचे दर, सरकार थेट निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट अर्ध्यावरच.. – Marathi News | Central government may take decision to reduce import duties on gold and silver


भारतात सोने आणि चांदीवर इंपोर्ट ड्यूटी लागू करण्यात आली. परदेशी चलनावरील दबाव कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. ज्याने सोने आणि चांदीचे भाव वाढले. आता सर्वसामान्यांसाठी अत्यंत मोठा दिलासादायक बातमी आहे. सरकार इंपोर्ट ड्यूटी कमी करण्याबाबत निर्णय घेऊ शकते. ज्यामुळे देशभरात सोने आणि चांदीचे भाव दणक्यात खाली येऊ शकतात. सोने खरेदी करण्यासाठी हीच मोठी संधी असेल. रत्न आणि आभूषण परिषदेचे चेअरमन राजेश रोकडे यांच्या माहितीनुसार, सरकार सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करू शकते. अजून त्याबाबत निर्णय झाला नाही पण तश्या हालचाली सुरू आहेत. इंपोर्ट ड्यूटी वाढून सोने आणि चांदीची आयात कमी करण्याचा सरकारचा निर्णय होता. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही.

याउलट बेकायदेशीर गोष्टी अधिक घडत आहेत. यामुळे सरकार योग्य वेळी सोन्यावरील इंपोर्ट ड्यूटी कमी करू शकते.  द इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रत्न आणि आभूषण परिषदेचे चेअरमन राजेश रोकडे यांनी म्हटले की, ड्यूटी वाढवण्याचा अर्थ असा नाही की, सोने आणि चांदीची आयात कमी होईल.

सराफा व्यापाऱ्यांनी अगोदरच इशारा दिला होता की, इंपोर्ट ड्यूटी वाढवली तर बेकायदेशीर गोष्टी अधिक होतील आणि त्याच गोष्टी बघायला मिळत आहेत. आता त्यावरच विचार केला जात आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच इराण अमेरिका युद्धादरम्यान परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी 6 टक्क्याहून 15 टक्के इंपोर्ट ड्यूटी केली. केंद्र सरकारने इंपोर्ट ड्यूटीमध्ये थेट मोठी वाढ केली.

भारत हा जगात चीननंतर सर्वात जास्त सोने आयात करणारा देश आहे. देशात 700 ते 900 टन सोने आयात केले जाते. सोन्यावरील इंपोर्ट ड्यूटी वाढवल्याने ग्राहकांसोबत व्यापाऱ्यांवर परिणाम झाला. पण इंपोर्ट ड्युटी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढूनही सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट बेकायदेशीर गोष्टी अधिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे याबाबत आता लवकरच सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *