Accident News : झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. ऑटो आणि कंटेनरच्या धडक होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. चांदवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देढ तांगवा खोऱ्यात हा अपघात झाला. या अपघातात एकाच वेळी सात जणांचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात ऑटो-रिक्षाचा चक्काचूर
भीषण अपघातानं झारखंडमधील लातेहार जिल्हा हादरला आहे. ऑटो आणि कंटेनरच्या या अपघातात सात जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ऑटो-रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. त्यातील सात जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एक ऑटो-रिक्षा चांदवाच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरला धडकली आणि अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवाशी लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिस प्रशासनाला देखील लगेच या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू
दरम्यान, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की, रिक्षातील अनेक जण थेट कंटेनरखाली चिरडले गेले. अपघातामुळं घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जवळचे रहिवासी मदतीसाठी धावून आले. परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ पोलीस आणि प्रशासनाला या मोठ्या अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, चांदवा पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोरंजन प्रसाद सिंग आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. मृतांची नेमकी संख्या आणि गंभीर जखमींची ओळख याबाबतची संपूर्ण माहिती प्रशासन अद्याप गोळा करत आहे. जखमींवर उपचार करणे हे आमचे प्रथम प्राधान्य असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांची ओळख पटताच त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात येईल. प्रशासन संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली