देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?


Gold Price News :  दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना सोन्या चांदीची खरेदी करणे परवडत नाही. आजच्या घडीला सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी दीड लाख रुपयांच्यावर गेला आहे. दरम्यान, ज्यावेळी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी सोन्याचा दर काय होता? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात  देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती दर होता? आणि आजची दराची काय स्थिती  आहे? 

1947 साली सोन्याचा भाव काय होता? 

15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम फक्त 88.62 रुपये होता. आजचा काळा बघितला तर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सहजासहजी सोन्याची खरेदी करणं अवघड होत आहे. आज स्वातंत्र्यांच्या 79 वर्षांनंतर म्हणजे 15 ऑगस्ट 2026 रोजी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.51 लाख रुपये आहे.

GolD Rate : आजचा सोन्याचा दर काय?

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळचे सोन्याचे दर आणि आजच्या दरातील तफावत पाहिली तर सोन्याच्या दरात तब्बल 1700 पटींनी वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात सोन्याच्या दरात 1700 पटींनी वाढ झाली आहे. आज स्वातंत्र्यांच्या 79 वर्षांनंतर म्हणजे 15 ऑगस्ट 2026 रोजी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.51 लाख रुपये आहे. 

तेव्हा सोन्यात 1000 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य काय असते? 

15  ऑगस्ट 2026 रोजी 1000 ची गुंतवणूक 17 लाख झाली असती. त्याचप्रमाणे, जर 1947 मध्ये 5000 गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य सुमारे 85 ते 86  लाख रुपये झाले असते. हे केवळ सोन्याच्या किमतीवर आधारित आहे. यामध्ये जीएसटी, घडणावळ शुल्क आणि खरेदी व विक्री किमतीतील फरक यांसारख्या घटकांचा समावेश नाही. या काळात सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. 

2000 सालानंतर सोन्याच्या दरात वेगान वाढ 

1950  मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 99.18 रुपये होता. 1970 मध्ये हा भाव 184.50 रुपयांवर पोहोचला. 1980 पर्यंत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांच्या पुढे गेला होता. 2000 नंतर सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली, जेव्हा 10 ग्रॅमचा भाव 4000 रुपयांच्या वर गेला होता. म्हणजे 2000 सालानंतर सोन्याच्या दरात वेगान वाढ झाली आहे. 2010-11 मध्ये, तो प्रति 10 ग्रॅम 19227 पर्यंत वाढला. 2020-21 मध्ये, सोन्याचा भाव 48723 पर्यंत घसरला आणि 2024-25 मध्ये, सरासरी भाव प्रति 10 ग्रॅम 75841 वर पोहोचला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *