BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 


AUS vs BAN 1st Test डार्विन : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी 13 ऑगस्टपासून सुुर आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना त्यांनी कधीच विचार केला नसेल असं चित्र पाहायला मिळालं. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांच्या समोर ऑस्ट्रेलियाची मजबूत मानली जाणारी फलंदाजी गडगडली. ऑस्ट्रेलियाचा पूर्म संघ पहिल्या डावात 198 धावा करु शकला. तर, पहिल्या दिवशील बांगलादेशनं पहिल्या डावात 1 बाद 96 धावा केल्या.  बांगलादेशचे तंजीद हसन नाबाद 32 धावा आणि मोमिनुल हक नाबाद 35 करत मैदानावर आहेत. मिशेल स्टार्कनं एक विकेट घेतली, शादमान इस्लाम 20 धावा करुन बाद झाला.  

ऑस्ट्रेलिया सहा महिन्यानंतर कसोटी सामना खेळत आहे. मारारा क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या सामन्यातील पहिल्या दिवशी बांगलादेशनं वर्चस्व गाजवलं. बांगलादेशनं वेगवान गोलंदाज नाहिद राणा नसताना ऑस्ट्रेलियाला हादरे दिले. हसन महमूदनं सहा विकेट घेतल्या. 

ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्यांदा बांगलादेश विरोधात 200 धावांच्या आत आटोपला. यापर्वी ऑस्ट्रेलियाची बांगलादेशविरोधातील धावसंख्या 217 धावा होती. 2017 मधील मीरपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव झाली होता. त्या सामन्यात शाकिब अल हसन यानं मॅचमध्ये दोन वेळा पाच पाच विकेट घेतल्या होत्या आणि 84 धावांची खेळी केली होती. डार्विनमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 198 धावांवर रोखलं आहे. 

ऑस्ट्रेलियानं डावाची सुरुवात चांगल्या प्रकारे केली होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली होती. मात्र, त्यानंतर नियमित अंतरानं ऑस्ट्रेलियानं विकेट गमावल्या.  

हसन महमूदनं जेक वेदराल्ड याला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये त्यानं ट्रेविस हेडला बाद केलं. स्टीव्ह स्मिथनं 71 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करताना दोन धावांवर त्याचा कॅच सुटला होता.  मार्नस लाबुशेन, कॅमेरन ग्रीन देखील मोठी खेळी करु शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाची अवस्था बिनबाद 45 वरुन 4 बाद 74 झाली होती. एलेक्स कॅरीनं सुरुवातीला मोठी फटकेबाजी केली, मात्र तो हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. बांगलादेशच्या हसन महमूदनं 53 धावा देत ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरोधात 6 विकेट घेणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू होण्याचा मानं हसन महमूदला मिळाला आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *