Nashik Earthquake Marathi News: नाशिक जिल्ह्यात शनिवारी (8 ऑगस्ट) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के (Earthquake In Nashik) जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते. मात्र, शनिवारी रात्री शहरी भागातही धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
8 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरापर्यंत काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांमध्ये भांडी आणि वस्तू पडल्याच्या घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Nashik Earthquake Marathi News)
नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या या घटनांवर प्रशासनाचे लक्ष- (Nashik Earthquake)
दरम्यान, या भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता वाढवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या या घटनांवर प्रशासनाचे लक्ष असून नागरिकांनी शांतता आणि सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू