कोंड्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा कडुलिंबाचे तेल – Marathi News | Make neem oil at home using a very simple method to get relief from dandruff


बदलती जीवनशैली तसेच वाढते प्रदूषण यामुळे याचा परिणाम आरोग्याबरोबरच त्वचेवर आणि केसांवर होताना दिसत आहे. केस गळण्यासोबतच कोरडेपणा, कोंडा आणि खाज यांसारख्या समस्याही वाढत आहेत. जर तुम्हाला एकाच वेळी या सर्व समस्या जाणवत असतील, त्यावर तुम्हाला घरगूती उपाय करायचे आहे तर कडुलिंबाचे तेल एक उपाय ठरू शकते. ते योग्य प्रकारे तयार करून लावणे आवश्यक आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण घरच्‍या घरी अगदी सोप्या पद्धतीने कडुलिंबाचे तेल बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात.

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टीरिअल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. यामुळे स्कॅल्पवरील कोंडा आणि उवा काढून टाकण्यास, केसांची मुळे मजबूत करण्यास आणि स्कॅल्पचे संक्रमण टाळण्यास मदत करते.

कडुलिंबाचे तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप कडुलिंबाची पाने (200-250 ग्रॅम)

1 कप खोबरेल तेल

2 मोठे चमचे मेथीचे दाणे

कडुलिंबाचे तेल बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

कडुलिंबाचे तेल बनवण्यासाठी 2 मोठे चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा.

दुसऱ्या दिवशी प्रथम कडुलिंबाची पाने घेऊन ती स्वच्छ पाण्याने नीट धुवा.

आता त्यांना सुकण्यासाठी बाजूला ठेवा. कडुलिंबाच्या पानांमध्ये अजिबात ओलावा शिल्लक राहू नये याची काळजी घ्या.

यानंतर एका भांड्यात मेथीचे दाणे, पाणी आणि वाळलेली कडुलिंबाची पाने टाका.

आता हे सर्व घटक मिक्सरच्या भांड्यात टाकून घट्ट पेस्ट तयार करा.

एक कढई‍ घ्या आणि त्यात खोबरेल तेल टाकून गरम करा.

तेल कोमट असावे हे लक्षात ठेवा. आता या कोमट तेलात पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करा.

हे तेलाचे मिश्रण मंद आचेवर किमान 10-15 मिनिटे उकळवावे लागेल.

या प्रक्रियेमुळे कडुलिंबाचे गुणधर्म तेलामध्ये शोषले जाण्यास मदत होते.

तुमची इच्छा असल्यास पेस्ट न बनवता तेलात सुकी कडुलिंबाची पाने आणि मेथीचे दाणे देखील मिक्स करू शकता.

या प्रक्रियेत पाने कुरकुरीत होईपर्यंत तेल उकळावे लागते.

यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या.

त्यानंतर एका मोठ्या भांड्यात चाळणी ठेवून तेल गाळून घ्या.

शेवटी ते एका काचेच्या बरणीत ठेवा, तुमचे कडुलिंबाचे तेल तयार आहे.

हे तेल केसांना लावायची योग्य पद्धत

हे तेल आठवड्यातून 2-3 वेळा लावता येते. ते थोडे गरम करून 5-6 मिनिटे आपल्या स्कॅल्पवर लावून हळुवारपणे मालिश करा. ते 1 तास तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *