Amruta Khanvilkar: या व्यक्तीमुळे अमृता – हिमांशूच्या नात्यात मिठाचा खडा? नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं सर्वांचं लक्ष – Marathi News | Amruta Khanvilkar divorce rumors with husband himanshu malhotra due to extra marital affair with adinath kothare


Amruta Khanvilkar: कायम आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर अमृता पती हिमांशू मल्होत्रा याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता आणि पती हिमांशू मल्होत्रा आता एकत्र राहत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्रीने एक पोस्ट केली ज्यामुळे चर्चांनी आणखी जोर धरला आहे. आता अमृता आणि हिमांशू यांच्या नात्यात कोणी मिठाचा खडा टाकला? असे  अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.

अमृता आणि हिमांशू यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला, पण दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही. अशात अमृता हिच्या नात्याची चर्चा एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होत आहे. अमृता आणि हिमांशू यांच्या घटस्फोटाची पोस्ट समोर येताच नेटकऱ्यांच्या कमेंट्सने लक्ष वेधलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘असं वाटत आहे की, आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अमृता खानविलकर रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच आदिनाथ याचा देखील घटस्फोट झाला आहे… दुसऱ्या बाजूला देखील तेच चित्र दिसत आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘आदिनाथ कोठारे संबंधीत रंगणाऱ्या खऱ्या होत्या?’ सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त अमृता हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

चर्चा रंगल्यानंतर अमृताची क्रिप्टिक पोस्ट

अमृता म्हणते, ‘आापण काय बोलतो, आपल्याला काय म्हणायचं आहे… आणि आपल्याला काय सांगायचं असतं आणि आपण काय बोलतो यामध्ये बऱ्याचदा प्रेम हरवून जातं…’, अमृताच्या अशा पोस्टनंतर घटस्फोटाच्या चर्चांनी अधिक जोर धरल आहे. पण यावर अभिनेत्री अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त अमृताच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2015 मध्ये अमृता आणि हिमांशू यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाआधी जवळपास  10 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण आता लग्नाच्या 11 वर्षांनंतर अमृता आणि हिमांशू यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *