Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह


Nagpur Crime News: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात (Khaperkheda) रविवारच्या रात्री घडलेल्या गँगवारचा एक व्हिडीओ (Exclusive Video) समोर आला असून खापरखेडातील (Khaperkheda Crime) मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर कशा पद्धतीने गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तलवारी, लाठ्या-काठ्या आणि दगडांनी हाणामारी सुरू होती हे समोर आले आहे. या हाणामारीमध्ये दोन्ही टोळ्यांमधील तीन गुंड गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, एमडी या अमली पदार्थाच्या अवैध व्यवसायाच्या स्पर्धेतून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती आहे. (Nagpur Crime News)

Nagpur Crime Gang War : भर बाजारपेठेत गुंडांच्या दोन टोळ्या एकमेकांवर जीव घेणे हल्ले

दरम्यान, खापरखेडा मधील मुख्य बाजारपेठेत रविवारी रात्री जुन्या वादातून गँगवार भडकले होते. सुरज कावळे आणि शेरू उईके या कुख्यात गुंडांच्या टोळीने प्रतिस्पर्धी सुमित वंजाळ आणि डगम भोसकर टोळीतील गुंडांवर तलवार, चाकू, लाठ्या काठ्या आणि दगडांनी हल्ला चढवला होता. भर बाजारपेठेत गुंडांच्या दोन टोळ्या एकमेकांवर जीव घेणे हल्ले करत होती. यात हिमांशू रवी कडू (25) गंभीर जखमी झाला असून रक्षित कापसे आणि रोहित मेश्राम हेही जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सूरज कावळे, शेरू उईके, संघर्ष बागडे, साहिल उर्फ बूटऱ्या बागडे आणि सुदामा डहाके यांच्यासह दोन डझनाहून अधिक आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur Crime News: तडीपार आरोपींचा मुक्त वावर, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

धक्कादायक बाब म्हणजे सूरज कावळे आणि शुभम उईके हे नागपूर जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगार असल्याची माहिती आहे. तरीही ते दोघे राजरोसपणे नागपुरात वावरत होते आणि एमडी या अमली पदार्थाचा व्यवसाय करत होते. त्यांची प्रतिस्पर्धी टोळी ही एमडीचा व्यवसाय करू लागली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर गेले काही दिवस खापरखेडामध्ये दोन्ही टोळ्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. रविवार रात्रीच्या घटनेतून फरार झालेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत. घटनेमुळे खापरखेडा परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तडीपार आरोपींच्या मुक्त वावरावरून पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *