BCCI Pension Policy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीनंतर खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) विशेष पेन्शन योजना राबवली जाते. 25 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेले खेळाडू बीसीसीआयच्या सर्वोच्च पेन्शन श्रेणीमध्ये (Highest Category) येतात. अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, 25 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या माजी खेळाडूंना दरमहा 70 हजार रुपये पेन्शन दिली जाते. 2022 मध्ये बीसीसीआयने पेन्शनच्या रकमेत सुधारणा केली होती. त्याआधी या श्रेणीसाठी 50 हजार रुपये मिळत होते, जे वाढवून आता 70 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेला आयुष्यभर ही पेन्शन मिळत राहील.
Ajinkya Rahane Pension : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून किती पेन्शन?
अजिंक्य रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व केले असून मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) स्वतःची पेन्शन योजना आहे. मात्र, नियमांनुसार कोणताही खेळाडू बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशन या दोन्ही ठिकाणाहून एकाच वेळी पेन्शन घेऊ शकत नाही. खेळाडूला या दोनपैकी एकाच संस्थेची पेन्शन निवडण्याचा अधिकार असतो. सामान्यतः खेळाडू ज्या ठिकाणी जास्त पेन्शन मिळते, ती योजना निवडतात.
जर अजिंक्य रहाणेने भविष्यात बीसीसीआय किंवा राज्य असोसिएशनमध्ये (उदा. राष्ट्रीय निवड समिती सदस्य, मुख्य प्रशिक्षक किंवा इतर कोणतेही पगारी पद) काम स्वीकारले, तर त्या कालावधीपुरती त्याची पेन्शन स्थगित केली जाईल. तो कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पेन्शन पुन्हा सुरू होते. मात्र, समालोचन (Commentary) किंवा आयपीएल फ्रँचायझीमध्ये मेन्टॉर, प्रशिक्षक म्हणून काम केल्यास पेन्शनवर कोणताही परिणाम होत नाही.
BCCI Medical Insurance : वैद्यकीय विमा किती मिळणार?
इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन (ICA) च्या संयुक्त वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत अजिंक्य रहाणेला 10 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय विमा कवच मिळतो. यामध्ये त्याची पत्नी आणि 25 वर्षांखालील मुलांचाही समावेश असतो.
गंभीर आजार किंवा मोठ्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चासाठी बीसीसीआयच्या ‘मेडिकल बेनेव्होलंट फंड’मधून (Medical Benevolent Fund) अतिरिक्त आर्थिक मदत मागण्याचा अधिकार खेळाडूला असतो.
खेळाडूच्या पश्चात त्याच्या पात्र पत्नीला दरमहा मिळणाऱ्या पेन्शनच्या 50 टक्के रक्कम पेन्शन (Family Pension) म्हणून मिळण्याची तरतूद आहे.
ही बातमी वाचा: