विधान परिषद उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास… संशय कुणावर? – Marathi News | Burglary at Legislative Council Deputy Chairman residence 2 crore and 65 lakh stolen from Sachin Ahir home Who is suspected


सचिन अहिर यांच्या घरी जबरी चोरी

Sachin Ahir House Theft: शिवसेना नेते आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत सुमारे २.६५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला पहिले मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. त्याला फोर्ट येथील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

विश्वासू नोकरानींच केला घात

घरातील विश्वासू नोकरानींच टप्प्याटप्प्याने चोरी केल्याचा संशय आहे. चोरीच्या वस्तूंमध्ये सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रकमेचा समावेश आहे. २०२५ मधील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज खराब झाल्याने चोरट्यांनी फायदा घेतला. घरातील चार नोकरांनी पद्धतशीरपणे चोरी केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

पोलिसांनी केली एकाला अटक

पोलिसांनी प्रकरणात प्रवाणी रमेश सोलंकी याला अटक केली आहे. तो गेल्या 24 वर्षांपासून अहिर यांच्या घरात काम करत आहे. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी याने चोरीचा माल विकल्याची आणि त्यातून मिळालेले पैसे साथीदारांमध्ये वाटल्याची कबुली दिली आहे. सचिन अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. गुन्हे शाखेचे डीसीपी राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सचिन अहिर यांचा मुला कृष्णा अहिर हे कुटुंबासह वरळी सी फेस येथील गुलरुख इमारतीत राहतात. प्रवीण सोलंकी हा गेल्या 24 वर्षांपासून तिथे साफसफाई करत होता. जुना नोकर असल्याने त्याला वरळीतील कार्यालयाच्या स्वच्छेतेचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

16 जुलै 2026 रोजी हे प्रकरण पहिल्यांदा उघड झाले. कुटुंबातील एका व्यक्तीला सांगण्यात आले की घरातील इतर कामगारांपैकी सतीशकुमार मिस्त्री आणि अमितकुमार प्रसाद यांना कमी पगार असतानाही झारखंडमधील त्यांच्या गावात नवीन घर, नवीन वाहनं आणि इतर मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर नोकरांची चौकशी करण्यात आल्यानंतर चोरीचे प्रकरण उघड झाले.

काय काय चोरले?

15 लाख रुपयांचे 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किट, 45 लाखांच्या हिरे जडीत सोन्याच्या दोन बांगड्या आणि अंदाजे 50 लाखांची हिरेजडीत अजून एक बांगडी त्यांनी चोरली. गुन्हे शाखेनुसार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी शॉर्ट सर्किटमुळे घरात आग लागली होती. या घटनेवेळी काही रक्कम चोरीला गेली होती. सीसीटीव्हीतही काही गडबड करण्यात आली होती. तर आरोपींच्या वतीने वकिलांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचा युक्तीवाद केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *