Sameer Choughule Angry On Student Protest: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले…


Sameer Choughule Angry On Student Protest: नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Paper Leak Case) ‘कॉकरोच जनता पार्टी’नं (Cockroach Janta Party) देशभरात एल्गार पुकारला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतर (Jantar Mantar) देशभरातून विद्यार्थी एकवटले आहेत. तर, देशाच्या कानाकोपऱ्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. तसेच, या आंदोलनाला, विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही रस्त्यावर उतरले आहेत. तर, काहींनी सोशल मीडियावर व्यक्त होत, विद्यार्थ्यांना पाठींबा जाहीर केला आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेते समीर चौघुले (Actor Samir Choughule) यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी वाचलेल्या एका पोस्टचं उदाहरण देऊन समीर चौघुले (Samir Choughule) यांनी सध्याच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केलं आहे.  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनी फेसुबकवर एक सविस्तर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी वाचलेल्या एका सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ दिला आहे. तर, तरुण कोवळ्या मुला मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असतील किंवा “असच पाहिजे या मुलांना” हा आनंद त्यांना होत असेल, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय, असं त्यांनी म्हटलंय. यासोबतच त्यांनी ट्रोलर्सनाही सुनावलं आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? (Samir Choughule On Student Protest)

मराठी अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून ते म्हणालेत की, “आता एकाची पोस्ट वाचली… “परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे… जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत, ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार”… सुन्न झालो… आपण माणसे नाही राहिलो… झोंबी झालो आहोत… हा कोणता ‘उन्माद’ भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात…”

पुढे बोलताना समीर चौघुले यांनी लिहिलंय की, “त्या तरुण कोवळ्या मुला मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असतील किंवा “असच पाहिजे या मुलांना” हा आनंद त्यांना होत असेल, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय… प्रत्येक गोष्ट संवादानं 100 टक्के सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती… तरुण कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेनं बरसलेल्या लाठ्या खूप व्यथित करतात… कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये…मुलांचे म्हणणं, समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे…”

समीर चौघुले यांनी याच पोस्टमध्ये ट्रोलर्सनाही सुनावलं आहे. पाच मुद्द्यांमध्ये समीर चौघुलेंचे ट्रोलर्सवर जबरदस्त टोले 

ट्रोलर्सना उद्धेशून बोलताना समीर चौघुले म्हणाले की, “काही टिप्स- 1. कलाकारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावे नको त्या भानगडीत पडू नये वगैरे सूचना द्यायला जाऊ नये… तुम्हाला सर्वांना तोच नियम लागू पडतो… मी ही तुमच्या सारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्हीही हिरिरीने मत मांडता, मी ही मांडतोय… 2. पहलगामच्या वेळी काय वाचा बसली होती का? त्याही वेळी व्यक्त झालोच होतो… त्यामुळे त्या वेळी का नाही बोललात कॅटेगरीत बोलू नये. 3. तुम्हाला आजपासून unfollow करतो – जशी आपली इच्छा… आनंदी रहा तुमच भलं होऊ दे… फक्त शांतपणे अनफॉलो करा… कमेंट करून सांगू नका…   4. मनातील द्वेषाचा निचरा मोकळा करायला वेगळी जागा शोधा… गलिच्छ शिवराळ हिणकस भाषा कृपया इथे वापरू नका… 5. किती पैसे मिळाले या पोस्टसाठी? – तुम्हाला मिळतात त्या पेक्षा थोडे जास्त…”

दरम्यान, देशाला धडकी भरवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन छेडलं आहे. आता हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटी समोर आले आहेत. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा,  आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत. तर, रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर, सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त होत, विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *