ममता बॅनर्जी यांना कोर्टाकडून मोठा दणका, दिलासा नाहीच, तब्बल 440 करोड.. – Marathi News | Mamata Banerjee has suffered major setback from the court with the refusal to unfreeze her bank accounts


पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला. सोमवारी कोलकात्ता हायकोर्टाने गोठवलेली बँक खाती वापर करण्यास नकार दिला. ED च्या PMLA ने गोठवलेली बँक खाती परत सुरू करण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेस आता विभागला गेला आहे. अनेक खासदारांनी पक्षाला राम राम केला. ज्यानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा दणका बसला. पश्चिम बंगालची सत्ता हातून गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांना एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत.  ममता बॅनर्जी यांची पार्टी त्यांच्या हातातून जाऊ शकते. त्यांचे चिन्ह देखील जाऊ शकते. कोलकात्ता उच्च न्यायालयाने न्यायाधीश कृष्ण राव यांनी अंतरिम आदेश जारी केला. ज्यात गोठवलेली खाती सुरू करण्यास नकार दिला. अशी आरोप आहेत की, विमान आणि हेलिकॉप्टर यापैशातून खरेदी करण्यात आली आहेत.

ईडीने बिधाननगर सायबर पोलिस ठाण्यात प्राथमिक माहितीनुसार, तपास हा सुरू करण्यात आला होता. बेकायदेशीर व्यवहार या बँक खात्यांमधून झाल्याचा आरोप आहे. ईडीने पीएमएलए कायदा 17 (1ए) नुसार कारवाई केली. तब्बल 440.42 करोड रूपये गोठवली आहेत, तसे आदेश देण्यात आली. तपासात स्पष्ट झाले की, हेलिकॉप्टर खरेदीसाठी 2023 मध्ये कॅमेन व्दिप इकाईकडून 17 लाख अमेरिकी डॉलरची व्यवस्था करण्यात आली.

ईडीच्या म्हणण्यानुसार, एम्ब्रेयर लेगेसी 600 विमान आणि अगस्ता हेलिकॉप्टर तृणमूल काँग्रेसने भा़ड्यावर दिली. एजन्सीचा आरोप आहे की, विमानाच्या उपयोगाच्या बहाण्याने पैसे दिली होती. या प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे. त्यामध्येच ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता देखील गेली. ईडीही त्यांच्या मागे लागल्याचे बघायला मिळतंय.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का तृणमूल काँग्रेसला बसला. थेट बंगालमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली. त्यानंतर पक्षातील महत्वाचे नेते पक्षाला सोडून जात आहेत. त्यामध्येच ईडीकडूनही मोठी कारवाई केली जातंय. ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच बँक खातीही गोठवण्यात आलीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *