मुंबई : राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे, अशातच शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) हे राज्याचे नवीन अर्थमंत्री असतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील राजकारणात नवे तर्क वितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) आणि विनोद तावडे यांची भेट, त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट,वर्षावरील भेटीगाठी आणि अखेरीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, या घटनाक्रमामुळे हे चर्चेत आले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांचा अर्थमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे देखील बोलले जात आहे, या सर्व चर्चांना आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुर्णविराम दिला आहे.(Jayant Patil on State Finance Minister)
Jayant Patil on State Finance Minister: पक्षाच्या विलीनीकरणाबाबत आमची कोणतीही चर्चा…
आम्ही एनडीए जाणार म्हणून जोरदार चर्चा माध्यमात सुरू असून आम्हाला एनडीए कडून कोणतेही निमंत्रण दिले नाही अथवा आम्ही जायचा प्रश्नच नाही. असा प्रश्न तुमच्या मनात कसा येतो असा सवाल जयंत पाटील यांनी माध्यमांना केला आहे. आज पंढरपूर येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या अधिवेशनासाठी जयंत पाटील हे पंढरपूरला आले असता बोलत होते. आम्ही कुठली खाते मागितली नाही किंवा कोणती चर्चा केली नाही तरीसुद्धा गेल्या दोन-तीन दिवसात तुम्ही मला दोन-तीनदा अर्थमंत्री पदाची शपथ दिली अशी कोटीही जयंत पाटील यांनी केली. पक्षाच्या विलीनीकरणाबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नसून कोणतीही चर्चा सुरू नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगत दोन राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चा फेटाळल्या. आम्ही आताही शासनाच्या विरोधातच काम करत असून शक्तिपीठ विरोधी आंदोलनासाठीच पंढरपूरला आलो आहे, त्यामुळे आम्ही सत्यासोबत जाणार या चर्चा तथ्य नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. पक्षाचे सर्व आमदार खासदार हे शरद पवार साहेब यांच्यासोबत असून कार्यकर्त्यांनी मनात संभ्रम बाळगण्याचे कारण नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
Jayant Patil on State Finance Minister: नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
“एनडीएने काय आम्हाला निमंत्रण दिलंय? की तिथे जायचा प्रश्न तयार होतो? मला असा प्रश्न तुमच्या मनात कसा येतो? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाहीये. आम्ही कुठलं खातं मागितलेलं नाही, कुठली मागणी केलेली नाही. पण तुम्ही त्याच्या आधीच मला गेल्या दोन-तीन दिवसात दोन-तीनदा शपथ दिल्यासारखे दिसतंय. विलीनीकरणाच्या चर्चा आमच्या कोणाशीही सुरू नाहीयेत. कोणतीही विलीनीकरणाची चर्चा या क्षणापर्यंत झालेली नाही. कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशीही चालू नाहीयेत. आता प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. हे पाहून आमचीच करमणूक होतेय. आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? मला कळत नाही आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना? आणि कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की, शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेने सर्व राहत आहेत, राहिलेले आहेत आणि ठामपणाने सर्व आमदार, सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे”.
Jayant Patil : सोनम वांगचू यांचे सोबत त्यांच्या पत्नीला ठेवणे गरजेचे…
गेली वीस दिवसापासून आंदोलन करीत असलेले सोनम वांगचू यांच्यावर केलेली कारवाई अत्यंत चुकीची असल्याची सडकून टीकाजयंत पाटील यांनी केली आहे. यानंतर त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले हे समजू शकतो मात्र लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या इतर समर्थकांना का हटवले हे मात्र कळले नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले.सध्या सोनम वांगचू यांची तब्येत खालावलेली असताना त्यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत ठेवणे गरजेचे असून त्या पद्धतीची व्यवस्था करण्याची मागणी ही जयंत पाटील यांनी केली आहे. यापूर्वीही त्यांना अटक करून राजस्थानमध्ये नेण्यात आले होते ..तेव्हाही त्यांच्या पत्नीला त्यांच्याशी संवाद साधू दिला नव्हता, त्यानंतर त्यांना सोडण्यात आले मात्र त्यांना अटक का केली हेही समजले नाही आणि नंतर का सोडले हेही समजले नसल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’