Video : प्रणित मोरेनंतर समय रैनाच्या शोमध्ये तरुणी नवऱ्याबद्दल नको ते बोलली… त्यावरुन मोठा वाद – Marathi News | Samay raina show indias got latent 2 male hater sakshi jha on pseudo feminist mindset


Video : कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोनंतर समय रैना याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ चा दुसरा सीझन चर्चेत आला आहे . नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये तरुणी साक्षी झा हिने पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्यामुळे साक्षी हिला ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. सांगायचं झालं तर, यंदाच्या सीझनमधील साक्षी पहिलीची स्पर्धक आहे. जिला सर्व पॅनलिस्टने शुन्य नंबर दिले आहेत. तर साक्षी हिने स्वतःला 8 नंबर दिले. साक्षी हिच्या कोणत्या वक्तव्यामुळे वाद सुरु आहेत, ते जाणून घ्या. साक्षी हिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘इंडियाज गॉट लेटंट 2’ (India’s Got Latent 2) च्या ऑडिशन फेरीत साक्षीने स्वतःची ओळख मॅन हेटर म्हणून करुन दिला. म्हणजे अशी तरुणी जिला पुरुषांचा प्रचंड तिरस्कार आहे. साक्षी म्हणाली, तिला तिच्या नवऱ्याला दारु पिऊन मारायचं आहे. फक्त नवराच नाही तर, वडील आणि भावाचा देखील मला तिरस्कार आहे… असं देखील साक्षी म्हणाली आहे. साक्षी हिचं हे वक्तव्य पॅनलिस्टला बिलकूल आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी साक्षीला नंबरच दिले नाही. शिवाय प्रेक्षकांकडून देखील तिला उत्तम प्रतिसाद मिळाला नाही.

सांगायचं झालं तर, साक्षी झा हिच्या ऑडिशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समय रैना, तिला विचारतो, ‘तुला दारु पिऊन नवऱ्याला मारायचं आहे….’ यावर साक्षी म्हणाली, ‘मला खरंच नवऱ्याला बेल्टने मारायचं आहे. माझी एक फँटसी आहे, मला माझ्या आयुष्यात रेड फ्लॅग सारखं काही हवं आहे…’

साक्षी झा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ही बिहार येथील राहणारी आहे आणि एक शिक्षक आहे. शिवाय साक्षी एक कंटेंट क्रिएटर देखील आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या देखील फार मोठी आहे. अशात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे साक्षी हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला “तिच्यासारख्या लोकांमुळेच अनेकांनी स्त्रीवादाचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली आहे. ती ‘केवळ दिखाऊ स्त्रीवादा’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानसिकतेचं उत्तम उदाहरण आहे.”





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *