मुंबई: गेल्या काही वर्षात देशातल्या सद्य परिस्थितीवर व्यक्त होणारे अनेक युट्यूबर्स लोकप्रिय झाले. काही सरकाराच्या कामाचं कौतुक करताना दिसतात, तर काही टीका करत प्रश्न विचारतानाही दिसतात. असाच एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे ध्रुव राठी . ध्रुव राठी केंद्र सरकारवर , पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतो.
ध्रुव राठी यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर रूपालीनं त्याला सोशल मीडियावर जोरदार खडेबोल सुनावले आहेत. मात्र, या वादानंतर सोशल मीडिया युझर्संनी रूपाली गांगुलीलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
रुपाली गांगुली विरुद्ध ध्रुव राठी हा वाद नेमका काय आहे?
तर झालं असं की, ध्रुव राठीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यानं लिहिलं होतं, “मोदी जिथं जातील तिथं त्यांचा अपमान झाला पाहिजे.पंतप्रधान झाल्यापासून गेल्या १२ वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. एक नेता म्हणून पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत.मी इतर युरोपीय देशांतील परदेशी पत्रकारांना प्रोत्साहन देऊ इच्छितो की, मोदी जिथं दिसतील तिथं त्यांना प्रश्न विचारावेत, जेणेकरून ते लोकांसमोर उत्तर देण्यास भाग पडतील.
रूपाली गांगुलीचे ध्रुव राठीला उत्तर
ध्रुव राठीच्या या विधानावर रूपाली गांगुली प्रचंड संतापली. त्याच्या पोस्टला कोट करत रूपालीनं लिहिलं की आमच्या पंतप्रधानांसाठी ‘अपमान’ हा शब्द ऐकणं अत्यंत विचित्र आहे. अशा नेत्यासाठी हा शब्द वापरला जात आहे ज्यांना जगभरातील देश आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करत आहेत. माझे पंतप्रधान आज जगातील सर्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित आणि प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक आहेत. ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान आहेत.
तसंच रूपालीनं पुढं लिहिलं की, भारताच्या प्रगतीची काळजी आम्हा भारतीयांवर सोडा. आपल्या देशासाठी काय चांगलं आहे हे ठरवण्यास १४० कोटींहून अधिक भारतीय सक्षम आहेत. परदेशात बसून, भारताच्या वास्तवापासून पूर्णपणे तुटलेल्या आणि भारताचा द्वेष करून स्वतःची ऑनलाईन कारकीर्द बनवणाऱ्या कोणत्याही यूट्यूबरची आम्हाला प्रवक्ता म्हणून गरज नाही.
एका युझरनं लिहिलं की, पंतप्रधानांनी १२ वर्षांत एकही खुली पत्रकार परिषद घेतली नाही हे वास्तव आहे, यावर तुझं काय म्हणणं आहे अनुपमा? तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं की, चित्रपटात किंवा मालिकांमध्ये स्क्रिप्ट वाचणं सोपं असते, पण देशाच्या लोकशाहीत प्रश्न विचारणं चुकीचं नाही.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा