कथेची गरज असेल तर, कपडे काढायलाही…., ‘जय मल्हार’ फेम बानू निर्मात्यांच्या अपेक्षांबद्दल असं काय बोलून गेली? – Marathi News | Jai Malhar fame banu aka Isha Keskar breaks silence on unwanted demand from producer and director Marathi entertainment industry


अभिनेत्री ईशा केसकर हिने फार कमी काळात मराठी सिनेविश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत ईशा हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘जय मल्हार’ मालिकेत साकारलेल्या ‘बानू’ या भूमिकेनंतर अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. पण आता ईशा तिच्या सिनेमामुळे किंवा भूमिकेमुळे चर्चेत आली नसून, एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ईशा हिने इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, दिग्दर्शत, निर्मात्यांच्या अभिनेत्रींकडून असणाऱ्या अपेक्षा आणि मागण्यांबद्दल देखील ईशा हिने खुलासा केला आहे. शिवाय इंडस्ट्रीमध्ये आलेला अनुभव देखील अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

कोणतीही भूमिका निवडण्यापूर्वी ईशा कोणत्या गोष्टीचा विचार करते? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर आलेला अनुभव सांगत अभिनेत्री म्हणाली, ‘भूमिका निवडताना मी खूप वेगळा विचार करते. कथेची गरज असेल तर, तुव्हाला कपडे देखील काढावे लागतील. तुम्ही कलाकार आहात तर, तुम्हाला अशा परिस्थितीसाठी तयार राहवं लागेल… तुमच्या भूमिकेला तुम्हाला योग्य न्याय देता आलाच पाहिजे…’ असं ईशा म्हणाली.

पुढे ईशा म्हणाली, ‘अनेकदा सिनेमात भडक सीन्सची काहीही गरज नसताना देखील अशा सीन्सचा भडिमार केला जातो. माझ्याकडे असे एक – दोन प्रोजेक्ट आलेले. यासाठी मला सांगण्यात आलं होतं की, माझे काही स्विमिंग सीन असतील आणि मला माहिती होतं, याची सिनेमाच्या कथेत काहीच गरज नाही. पण फक्त ‘ऑब्जेक्टिफिकेशन’ आकर्षण म्हणून तो सीन असणार होता.’

‘तुम्ही जर मी एक स्त्री आहे, म्हणून माझा असा वापर करत असाल. सिनेमाच्या कथेची गरज नसताना देखील मला असे सीन करायला सांगत असाल तर, मी परत कधी तुमच्या दारात देखील उभी राहणार नाही..’, असं देखील ईशा केसकर हिने मुलाखतीत स्पष्ट सांगितलं.

ईशा हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जय मल्हार’ मालिकेत साकारलेल्या ‘बानू’ या भूमिकेनंतर ईशा हिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसरख्या मालिकांमधून ईशा घराघरात पोहोचली. एवढंच नाही तर, ‘सरला एक कोटी’ सिनेमात देखील ईशाने महत्त्वाची भूमिका साकारली. ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *