राजकारणात मोठी उलथापालथ होणार; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ – Marathi News | Mla ravi rana claims that both ncp group will unite within 15 days


आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एनडीए हे या अधिवेशनात 3 विधेयक मांडण्याची शक्यता आहे. ही विधेयके पास करण्यासाठी भाजप प्रणित एनडीए आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. या राजकीय घडामोडीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. त्यानंतर सुप्रिया सुळे देशात कारभार पाहतील, तर राज्यात सुनेत्रा पवार कारभार पाहतील, असा दावा एका बड्या नेत्याने केला आहे. या नेत्याच्या दाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

देशाच्या राजकारणात येत्या काही दिवसांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. य शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी मोठं भाष्य केलं आहे. रवी राणा यांनी म्हटलं की, ‘ज्या पद्धतीने राजकारण अशक्य आहे. ते राजकारणात शक्य झालं आहे. येणार्‍या 15 दिवसांत सुनेत्रा वहिनी आणि शरद पवारांचे दोन्ही पक्ष एकत्र येतील. दिल्लीचं राजकारण सुप्रिया सुळे पाहतील. राज्यात सुनेत्रा वहिनी राजकारण पाहतील. केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री होतील. तर राज्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे राहील. त्यामुळे राजकारणात अशक्य आहे, ते शक्य होते. येत्या 15 दिवसांत हे शक्य होईल’.

उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा हातात घेतली. एकंदरित हनुमान चालीसाला विरोध केल्याने मुख्यमंत्रिपद गेलं. आमदार आणि खासदार गेले. मुंबईला त्यांनी हनुमान चालीसा वाचली. रामरक्षा वाचण्यासाठी नागपुरात येत आहेत. त्यांना माझं एकच सांगणं आहे की, नागपुरातील संघाच्या हेडगेवारांच्या प्रतिमेला वंदन करून या. अमरावतीचं हनुमान गढी येथे येऊन हनुमान चालीस वाचा. त्यानंतर येणार्‍या महिनाभरात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. कारण आज ठाकरेंनी भगवान रामाला स्वीकारलं आहे. त्यामुळे श्रीरामाच्या चरणी परतले आहेत. त्यामुळे आता जे अशक्य आहे, ते अशक्य राजकारणात पाहायला मिळेल, असा दावा रवी राणा यांनी केलाय. रवी राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता रवी राणा यांच्या दाव्यावर राजकीय नेते काय भाष्य करतात, हे पाहावे लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *