लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स – Marathi News | Rohit Sharma cricket career likely to end at Lords wont play in ODI World Cup 2027 says Reports


लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्सImage Credit source: BCCI

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यात रोहित शर्माची बॅट काही चालली नाही. त्यामुळे तिसऱ्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम लागू शकतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आता फक्त वनडे सामने खेळत असून पुढचं लक्ष्य वर्ल्डकप 2027 असल्याचं त्याने अनेकदा बोलून दाखवलं आहे. पण इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या शेवटचा वनडे सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे. हा सामना 19 जुलैला होणार असून या सामन्यातील कामगिरीवरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे. एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या निवड समितीने रोहित शर्माला स्पष्टपणे सांगितलं आहे की तो वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा भाग नसेल. तसेच ही वनडे मालिका त्याच्या कारकि‍र्दीची शेवट असेल.

कार्डिफमध्ये 16 जुलैला भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष लागून होतं. यात विराट कोहली तर पास झाला. पण रोहित शर्मा मात्र अपयशी ठरला. रोहित शर्माने 47 चेंडूंचा सामना केला. पण यात आपली छाप काही सोडू शकला नाही. पहिल्या वनडे सामन्याप्रमाणे या सामन्यातही संघर्ष करताना दिसला. शेवटी 26 धावा करून तंबूत परतला. या खेळीमुळे रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  त्यानंतर एका रिपोर्टनुसार रोहित शर्माची क्रिकेट कारकीर्द फार दिवस नसल्याचा दावा करण्यात आला.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवट असणार आहे. रविवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. हा रोहित शर्माच्या करिअरचा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. रोहित शर्माने आधीच टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे फक्त वनडे सामने खेळत होता. आता या बातम्यांनी त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *