IND vs ENG 2nd ODI: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील दुसरा वनडे सामना आज कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या वनडेत भारताने एजबेस्टन येथे इंग्लंडचा 6 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (IND vs ENG 2nd ODI)
Hello, Cardiff 👋#TeamIndia touches down for the 2️⃣nd ODI as we look to seal the series 🙌#ENGvIND pic.twitter.com/pJ9uoOdvOP
— BCCI (@BCCI) July 16, 2026
पहिल्या वनडेत भारताचा दमदार विजय- (Ind vs Eng Series)
पहिल्या सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेलने शानदार कामगिरी करत गोलंदाजीत 4 विकेट्स घेतल्या आणि नाबाद 57 धावांची खेळी साकारत सामनावीराचा मान पटकावला. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले, तर कर्णधार शुभमन गिलने 80 धावांची उत्कृष्ट खेळी करत भारताचा विजय सोपा केला.
शुभमन गिल पूर्णपणे फिट- (Shubhman Gill Ind vs Eng)
पहिल्या सामन्यादरम्यान शुभमन गिलला (Shubhman Gill) दुखापत झाल्याची चर्चा होती. मात्र, गिलने स्वतः स्पष्ट केले की ही गंभीर दुखापत नव्हती. उष्ण हवामान आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे त्याच्या पायाला क्रॅम्प आला होता. त्यामुळे त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ व्हावे लागले. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून कार्डिफमधील दुसऱ्या वनडेसाठी उपलब्ध असल्याचे शुभमन गिलने सांगितले आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो एक बदल- (IND vs ENG 2nd ODI)
शुभमन गिल फिट असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन विजयी संघात फारसा बदल करण्याच्या विचारात नाही. मात्र, एका जागेवर बदल होण्याची शक्यता आहे. गुरनूर ब्रारच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याची दुखापत कायम असल्यास दुसऱ्या वनडेत फिरकीपटू कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते.
कुलदीप यादवला मिळू शकते संधी- (Kuldeep Yadav India vs England)
गुरनूर ब्रारच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याची दुखापत कायम असल्यास दुसऱ्या वनडेत फिरकीपटू कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात कुलदीपला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (Ind vs Eng 2nd ODI Playing XI)
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा: