Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर का झुकणार नाही? नितेश राणेंकडून त्या बद्दल खुलासा – Marathi News | Row over aamir khan third marriage with Gauri spratt Maharashtra minister nitesh rane called love jihad clarifies controversial statement


बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने नुकतचं गौरी स्प्रॅट बरोबर तिसरं लग्न केलं. त्याच्या या लग्नावरुन वादाचा मोठा धुरळा उडला आहे. अनेकांनी या विवाहावर मत व्यक्त केली आहे. मौलवी सुद्धा यावर बोलत आहे. भाजपं नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. नितेश राणे हे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. नितेश राणे यांनी या संपूर्ण विषयावर आता मौन सोडलं आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. नितेश राणे यांनी आमिर खानला लव जिहादचा ब्रांड एम्बेसडर म्हटलं. त्या संदर्भात नितेश राणेंना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ‘एका हिंदू कार्यकर्ता म्हणून मी अनेक कुटुंबांना, मुलींना भेटलोय, जे लव जिहादचे बळी ठरले आहेत’

“मी ज्या कुटुंबांना भेटलो, त्यांचं असं म्हणणं होतं की, आमच्या मुलींना फसवणारे लोक बऱ्याचदा आमिर खान सारख्या मोठ्या स्टार्सची उदहारण देतात. बघ, हे लोक कसं आयुष्य जगतायत, तू सुद्धा हाच मार्ग स्वीकार” असं नितेश राणे म्हणाले. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “माझ्या याच अनुभवाच्या आधारावर मी आमिर खानला ‘लव जिहादचं ब्रांड एम्बेसडर’ म्हटलं. ज्यावेळी एखादा व्यक्ती कोट्यवधी लोकांसाठी स्टार बनतो, तेव्हा त्याने आपलं खासगी आयुष्य आणि सार्वजनिक प्रतिमा दोन्ही संभाळलं पाहिजे”

त्याच्याविरोधात फतवा जारी केला

नितेश राणे म्हणाले की, “लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की, पडद्यावरील व्यक्तीरेखा आणि खऱ्या आयुष्यातील व्यक्ती वेगवेगळे आहेत. कुठल्याही सेलिब्रिटीच्या मागे डोळे बंद करुन जाण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे” आमिर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसाला गौरी स्प्रॅटची मीडियासोबत गर्लफ्रेंड म्हणून ओळख करुन दिली होती. लग्नासाठी मी पूर्णपणे तयार नाही असं त्यावेळी आमिर म्हणालेला. 5 जुलै 2026 रोजी आमिर खानने मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी ग्रौरी स्प्रॅट सोबत लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न आहे. याआधी त्याने रीना दत्ता आणि किरण राव सोबत लग्न केलं आहे. आमिर खानने तिसरं लग्न केल्यानंतर उत्तर प्रदेश मुस्लिम पर्सनल दारुल इफ्ताचे शाही चीफ मुफ्ती मौलाना चौधरी इब्राहिम हुसैन यांनी त्याच्याविरोधात फतवा जारी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *