आता उत्तर भारतातही होणार ‘ईशा ग्रामोत्सव’, 80 हजार खेळाडू होणार सहभागी – Marathi News | Isha Gramotsavam to be held in North India too 80,000 athletes to participate


सद्गुरूंनी स्थापन केलेल्या ‘ईशा आऊटरीच’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा देशातील सर्वात मोठा वार्षिक ग्रामीण क्रीडा महोत्सव,’ईशा ग्रामोत्सव’, आता उत्तर भारतातील गावांमध्ये देखील सुरू होणार आहे. दक्षिण भारतातील ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेली ही क्रीडा स्पर्धा, प्रथमच उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातही आयोजित केली जाईल. हा क्रीडा महोत्सव दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित होणार आहे. यंदा सुमारे 40,000 गावांमधील 80,000 खेळाडू 7000 संघाच्या माध्यमातून या खेळ महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये जवळपास 15 हजार महिला खेळाडू देखील आपला सभाग नोंदवणार आहेत.

या खेळ महोत्सवात महाअंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या व्हॉलीबॉल आणि थ्रोबॉलच्या विजेत्या संघाला प्रत्येकी 5 लाख रुपयाचे रोख बक्षीस मिळणार आहे, तर उपविजेत्या संघाला प्रत्येकी तीन लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तर जे संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहतील त्या संघाला अनुक्रमे एक लाख आणि पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. क्लस्टर आणि विभागीय टप्प्यांमध्येही रोख बक्षिसे दिली जाणार आहेत, तसेच पॅरालिम्पिक श्रेणीसाठी देखील विशेष बक्षिसे राखून ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धांसाठी बक्षीस म्हणून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंच्या गुणांना वाव मिळणार आहे.

खेळाडू व्हॉलीबॉल (पुरुष) आणि थ्रोबॉल (महिला) स्पर्धांसाठी नोंदणी करू शकतात. ही स्पर्धा बहुस्तरीय स्वरूपात आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये क्लस्टर-स्तरीय सामने, विभागीय फेऱ्या आणि एक भव्य अंतिम सामना यांचा समावेश असेल. क्लस्टर सामने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील, तर अंतिम सामना 6 सप्टेंबर रोजी कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात, सद्गुरूंच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये, पाच ठिकाणी क्लस्टर-स्तरीय सामने आयोजित करण्यात येणार आहेत. पहिला टप्पा 25-26 जुलै रोजी लखनौ, वाराणसी, मुझफ्फरनगर आणि मेरठ येथे पार पडेल, त्यानंतर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गौतम बुद्ध नगर येथे विभागीय सामने होणार आहेत. तर दुसरीकडे हरियामध्ये क्लस्टर-स्तरीय सामने 25 आणि 26 जुलै रोजी पानिपत, कर्नाल आणि अंबाला येथे होणार आहेत. क्लस्टर सामन्यांचा पुढील टप्पा 1 आणि 2 ऑगस्ट रोजी हिसार आणि कुरुक्षेत्र येथे पार पडेल. विभागीय टप्पा 9 ऑगस्ट रोजी कर्नाल येथे होणार असून, त्यात विभागातील सर्व जिल्ह्यांचे संघ सहभागी होतील. ईशा ग्रामोत्सव 2026 साठी नोंदणीला सुरुवात झाली असून, ग्रामीण क्षेत्रातील खेळाडू ishagramotsavam.sadhguru.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे, तसेच अधिक माहितीसाठी 9654663702 या नंबरवर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *