Govindgiri Maharaj : उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा; त्यांनी रामरक्षा नीट बोलून दाखवावी मग आम्ही ही…; गोविंदगिरी महाराजांच थेट आव्हान


Govindgiri Maharaj :  उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा आहे. याबद्दल मी धन्यता मानतो. पण आंदोलन करताना त्यांनी रामरक्षा नीट पाठ करून बोलून दाखवावी, मग आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ, अशी प्रतिक्रिया गोविंदगिरी महाराज (Govind Giri Maharaj) यांनी दिली आहे. संघाच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये (Nagpur) ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये राम रक्षा आंदोलन केले जाणार आहे.  त्यानंतर संपूर्ण विदर्भातील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे. काँग्रेस, आप, सपा हे पक्ष सुद्धा राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी (Ayodhya Ram Mandir Donation Theft) आवाज उठवत आहेत. आपण देखील राज्यभरात आंदोलन केलं पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. अशातच याच मुद्द्यांवर बोट ठेवत गोविंदगिरी महाराज यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (Govind Giri Maharaj on Uddhav Thackeray)

दरम्यान, राम मंदिरातील पैसा फक्त हिंदूंचा नाही. यामध्ये मुस्लिम बांधवांनीही पैसे दिले आहेत. केंद्र सरकारने डॉक्टर अनिल मिश्रा आणि चंपक राय यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांचा विश्वास राखण्यात ते दोघेही अपयशी ठरले. असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले.

Govindgiri Maharaj : काँग्रेसने राम मंदिरासाठी काय केलं? त्यांना राम मंदिरावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

दुसरीकडे ज्योती शंकराचार्य यांच्या विधानावर गोविंदगिरी महाराज संतापले. त्यांनी राम मंदिराचा विरोध केला, त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध आहे. म्हणून त्यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये. असेही ते म्हणाले. तर काँग्रेसला दुसरं काही काम उरलं नाही, त्यांना कोणी विचारत नाही, काँग्रेसने राम मंदिरासाठी काय केलं? सुप्रीम कोर्टात त्यांनी राम मंदिरांचा अस्तित्व नाही असं सांगितलं. राम सेतुला विरोध केला, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना शिव्या दिल्या. लाठी काठी मारल्या आहेत. त्यामुळे त्यांना राम मंदिरावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले.

Govindgiri Maharaj : भाजपमध्ये इतर पक्षातील काही लोक आल्याने भाजप अशुद्ध

दरम्यान, भाजपमध्ये इतर पक्षातील काही लोक आले आहेत, त्यामुळे काही प्रमाणात भाजप अशुद्ध झाला आहे. चोरी झाली तर दान येत असताना सोने-चांदी यायचे कमी झाले. आता नाही येत आहे. चोरी करणाऱ्यांना एकवेळ त्यांना सरकारी शिक्षा होऊ द्या, मग मी त्यांना काय प्रायचित्य करायचे ते सांगतो. असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *