IND vs ENG 1st ODI पूर्वी मोठा ट्विस्ट, संघात मोठी फूट पडल्याची खळबळ समोर; नेमकं काय घडलं? – Marathi News | Ind vs eng gautam gambhir virat kohli avoid interaction team india practice session


भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने एडजबॅस्टन येथे मोठ्या प्रमाणावर सराव केला आहे. मात्र, त्या सराव सत्रादरम्यान असे काही घडले, ज्यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सामना सुरु व्हायला काही तास बाकी असताना ही बाब समोर आल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, बर्मिंगहॅममधील सराव सत्रादरम्यान गंभीर आणि विराट यांच्यात कोणताही संवाद झाला नाही.

या वृत्तानुसार, एडजबॅस्टन येथील सराव सत्रादरम्यान गंभीरने संघातील रोहित शर्मा, शुभमन गिल आणि केएल राहुल यांसारख्या जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंशी संवाद साधला. मात्र, प्रशिक्षक गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संवादाचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. अहवालानुसार, टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक, सितांशु कोटक, हे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यासोबत स्वतंत्रपणे नेट प्रॅक्टिसवर चर्चा करताना दिसले. भारतीय कॅम्पमधील अशा फोटोंमुळे एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियामधील मतभेद उघड झाले आहेत.

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संबंध आधीच ताणलेले आहेत. आयपीएल दरम्यान दोघांमध्ये झालेल्या भांडणाचे फोटोही चर्चेत आले होते. मात्र, त्यांच्यातील संबंध पुन्हा सामान्य झाल्याचे वृत्त होते. असे दिसते की गंभीर आणि विराट यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. असेही म्हटले जात आहे की गंभीर आणि विराट यांनी बऱ्याच काळापासून एकमेकांशी बोलणे बंद केले आहे. आता काय खरं आणि आणि खोटं हे अजून समोर आलेले नाही.

भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. टी-20 मालिका गमावल्यामुळे आता वनडे जिंकून त्याचा बदला पूर्ण करण्याचा उद्देश असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला एकत्र खेळताना पाहणं हे चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. आता सामना 3:30 वाजता सुरु होणार आहे तीन वाजता नाणेफेक होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *