Last Updated:
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 5 लाख रुपयांच्या हेल्थ इन्शुरेन्स कव्हर वाढवून 10 लाख करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.
नवी दिल्ली : आयुष्मानकार्ड हे भारतातील सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता सरकार आयुष्मान कार्डची विमा लिमिट वाढवण्यावर विचार करत आहे. संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण संबंधी स्थायी समितीने आपल्या 172 व्या रिपोर्टमध्ये केंद्र सरकारला ही शिफारस दिली आहे. समितीचा प्रस्ताव आहे की, लिमिट ही सध्याच्या 5 लाखांवरुन वाढवून 10 लाख रुपये केली जावी. यामागे कारण दिलंय की, उपचारासाठी लागणारा खर्च हा पहिल्यापेक्षा खुप जास्त झाला आहे. समिती मानते की, कोणत्याही मोठ्या प्रोसिजरमध्ये 5 लाख रुपयांची लिमिट ही खुप लवकर संपते. असावेळी विमा कव्हर वाढवून 10 लाख रुपये केलं जाणे ही वेळेची गरज आहे. खरतंर सध्या हा फक्त प्रस्ताव आहे आणि सरकारकडून यावर कोणतीही सहमती आलेली नाही.
समिती मानते की, उपचाराचा वाढता खर्च पाहता विमा कव्हर वाढवणं ही वेळेची गरज बनली आहे. आता अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. जोपर्यंत सरकार याला मंजुरी देत नाही, तोपर्यंत योजनेच्या नियमात कोणताही बदल मानला जाणार नाही.
कोणत्या कमिटीने दिल्या सुचना : संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण संबंधी स्थायी समितीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मिळणारं 5 लाख रुपयांपर्ंत कव्हर अेक प्रकरणांमध्ये पुरेसं नाही. समितीनुसार, मेडिकल महागाई सतत वाढतेय. अशावेळी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना चांगली सुरक्षा देण्यासाठी विमा कव्र 10 लाख रुपयांपर्यंत ठरवलं गेलं पाहिजे.
5 लाख रुपये का कमी पडताय? : काही वर्षांपूर्वी 5 लाख रुपयांचं हेल्थ कव्हर पुरेसं मानलं जातं होतं. पण आता अनेक मोठे ऑपरेशन आणि मोठे उपचार हे खुप महाग झाले आहेत. कँसरचे उपचार, हार्ट बायपास सर्जरी, लिव्हर किंवा किडनी ट्रान्सप्लांट आणि आयसीयूमध्ये दीर्घकाळ भरती राहण्याच्या प्रकरणांमध्ये लाखो रुपये खर्च होतात. असावेळी अनेक कुटुंबांना उर्वरित रक्कम ही आपल्या खिशातून द्यावी लागते.
लिमिट 10 लाख रुपये झाली तर काय फायदा होईल? : सरकारने ही शिफआरस मान्य केली तर आयुष्मान कार्डधारकांना गंभीर आजारांच्या उपचारात जास्त दिलासा मिळेल. महाग ऑपरेशन्स करणं सोयिस्कर होईल. कुटुंबावर उपचाराचा आर्थिक बोझा कमी होईल. अनेक रुग्णांना उपचार हे मध्येच थांबवावे लागणार नाहीत. विशेषतः गरीब आणि कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुबासाठी हा मोठा सहारा ठरू शकतो.
आयुष्मान भारत योजना काय? : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने केंद्र सरकारची सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनांमधून एक आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतात. उपचाराचा खर्च सरकार उचलते आणि रुग्णांना रुग्णालयात पैसे द्यावे लागत नाहीत. ही सुविधा सरकारी आणि लिस्टेड खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे.
कोणाला मिळतो या योजनेचा लाभ? : या योजनेचा लाभ मुख्यतः आर्थिक रुपाने कमकुवत आणि पात्र कुटुंबांना मिळतो. सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणना तसेच सरकारने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते. यासह, 70 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान वय वंदना योजने’अंतर्गत आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
