वनप्लसच्या पाठोपाठ आता रियलमी आणि पोकोचे ‘हे’ फोन झाले महाग, तुम्हाला मोजावे लागतील इतके रूपये – Marathi News | After OnePlus Realme and Poco have also made their mobile phones more expensive with prices increasing up to Rs 7000


स्मार्टफोनच्या किमती वाढतच आहेत. OnePlus 15R च्या दरवाढीनंतर Realme, Poco आणि Lava चे हे फोन मॉडल्स महाग झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला Realme कंपनीने 16 सिरीजमध्ये लाँच केलेल्या Realme 16, Realme 16 Pro आणि Realme 16 Pro Plus च्या किमतीही वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, Poco X8 Pro Max, Poco M8 5G आणि Lava Agni 4 हे फोन्स खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. चला तर मग आजच्या लेखात आपण किती रूपयांनी फोन्सच्या किमती वाढलेल्या आहेत ते जाणून घेऊयात.

भारतात Realme 16 ची किंमत

या हँडसेटचा 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 31 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता दरवाढीनंतर हा फोन तुम्हाला 33 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर यामध्ये 2 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

भारतात Realme 16 Pro Plus 5G ची किंमत

8GB रॅम आणि 256GB रॅम असलेला प्रो प्लस व्हेरिएंट 41 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. आता, किंमतवाढीनंतर हा फोन 48 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. प्रो प्लस व्हेरिएंटच्या किंमतीत तब्बल 7 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

भारतात Realme 16 Pro ची किंमत

8GB रॅम आणि 128GB रॅम असलेला प्रो व्हेरिएंट मूळतः 31 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता हाच फोन 36 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या किंमतीत 5 हजार रूपयांनी वाढली आहे.

भारतात Poco X8 Pro Max ची किंमत

हा पोको फोन आता अधिक महाग होणार आहे. 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट असलेला फोन 42 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र आता याच व्हेरिएंटची किंमत 44 हजार 999 रूपये इतकी झाली आहे. म्हणजेच खरेदी करताना हा फोन 2,000 ने महाग पडेल.

भारतात Poco M8 5G ची किंमत

या हँडसेटचा 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 18 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, पण आता हा व्हेरिएंट 2 हजाराने महाग झाला आहे. दरवाढीनंतर तुम्हाला हा फोन 20 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येईल.

भारतात Lava Agni 4 ची किंमत

लावा कंपनीच्या या मिड-रेंज फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच 24 हजार 999 रुपयांना लाँच झालेला हा फोन आता तुम्हाला 29 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *